|Sunday, April 23, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
पनामागेट प्रकरणी नवाझ शरीफ चौकशीच्या घेऱयात

इस्लामाबाद / वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची विशेष तपास दलाकडून चौकशी करण्यात यावी, असा आदेश पाक सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा असा आदेश न्यायालयाने न दिल्याने त्यांचे पद वाचले आहे. पनामागेट लीक्समधून त्यांच्या या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला होता. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने हा निकाल गुरूवारी दिला. ...Full Article

पॅलेस्टाईन अध्यक्षांना भेटणार ट्रम्प 3 मे रोजी होणार भेट

 वॉशिंग्टन :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 3 मे रोजी व्हाइट हाउस येथे पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मोहम्मद अब्बास यांना भेटणार आहेत. पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील वादावर तोडगा काढण्याच्या दिशेने या दौऱयात भरीव ...Full Article

सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :  अभियांत्रिकी, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देण्याची आवश्यकता राहणार नाही. फक्त एका प्रवेशपरीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचा पर्याय मिळणार आहे. केंद्रीय ...Full Article

प्रेयसीला रोखण्यासाठी विमान अपहरणाची अफवा

वृत्तसंस्था / हैदराबाद : ईमेल पाठवून मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद विमानतळावर विमान अपहरण होण्याची अफवा पसरविणाऱया व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. या व्यक्तीने स्वतःला सोडून जाणाऱया प्रेयसीला रोखण्यासाठी ...Full Article

10 कोटी रुपये, 10 किलो सोने जप्त

लखनौ / वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशात विविध सरकारी विभागांच्या अधिकाऱयांवर घातलेल्या धाडींमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती मोठे घबाड लागले आहे. 10 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबीं रक्कम जप्त करण्यात आली असून ...Full Article

इटलीच्या महापौराची शांती पुरस्कारासाठी निवड

रोम : युनेस्कोच्या शांती पुरस्कारासाठी यावर्षी इटलीचे बेट लॅम्पेडुसाच्या महापौर ग्यूसेपीना निकोलिनी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना हा पुरस्कार शरणार्थींचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याकरता देण्यात आला आहे. ...Full Article

अंमली पदार्थांपासून दूर रहा, निरोगी व्हा !

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : मोदी सरकारमधील मंत्री किरण रिजिजू आणि राज्यवर्धन राठोड हे आपल्या शारीरिक स्वास्थाची पूर्ण काळजी घेतात. केंद्रीय गृहराज्यमंत्री रिजिजू यांनी गुरुवारी एक चित्रफित अपलोड केली, ज्यात ...Full Article

ढाका विद्यापीठात हिंदू विद्यार्थ्यांना गोमांस वाढल्याने वाद

ढाका : बांगलादेशच्या प्रख्यात ढाका विद्यापीठाच्या उपहारगृहात हिंदू विद्यार्थ्यांना गोमांस वाढण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर उपहारगृह ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली आहे. रविवारी नवबांग्ला वर्ष ‘पहिला वैशाख’ ...Full Article

हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवादी जेरबंद

वृत्तसंस्था /नोएडा : उत्तर प्रदेशमधील दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) आणि पाच राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशीरा ...Full Article

नसीमुद्दिन सिद्दिकी यांना सर्व पदांवरून हटविले

वृत्तसंस्था /लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवानंतर कारवाई करत बहुजन समाज पक्षाने माजी मंत्री नसीमुद्दिन सिद्दिकी यांना सर्व पदांवरून हटविले आहे. सिद्दिकी आता फक्त राष्ट्रीय सचिव पदावर कायम ...Full Article
Page 5 of 2,563« First...34567...102030...Last »