|Monday, April 24, 2017
You are here: Home » क्रिडा » यजमान मुंबईविरुद्ध महाराष्ट्राचा जोरदार संघर्षयजमान मुंबईविरुद्ध महाराष्ट्राचा जोरदार संघर्ष 

Shrikant Mundhe 10114

वृत्तसंस्था

मुंबई

वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा दुसरा डाव केवळ 129 धावांमध्येच गुंडाळत महाराष्ट्र संघाने अक्षरशः सनसनाटी निर्माण केली असून आता चौथ्या डावात विजय नोंदवण्यासाठी त्यांना 9 गडी बाकी असताना अवघ्या 229 धावांची गरज आहे. शुक्रवारी तिसऱया दिवसअखेर हर्षद खडिवाले 6 धावांवर नाबाद राहिला.

वास्तविक, मुंबईच्या 402 धावांना प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राचा पहिला डाव केवळ 280 धावांमध्येच गुंडाळला गेला. मुंबईने यावेळी पहिल्या डावाअखेर 122 धावांची आघाडी नोंदवली. पण, नंतर महाराष्ट्राच्या फल्लाह (3/45), संकलेचा (4/57) व श्रीकांत मुंढे (3/26) या त्रिकुटाने मुंबईच्या लाईनअपला जबरदस्त खिंडार पाडत यजमान संघाला जोरदार धक्का दिला. यजमान मुंबई संघाची एकवेळ तर अगदी 5 बाद 24 अशी दारुण अवस्था झाली होती.

केवळ पहिल्या डावातील शतकवीर सुर्यकुमार यादव (33), इक्बाल अब्दुल्ला (27) व शार्दुल ठाकुर (33) यांनीच थोडाफार प्रतिकार केल्यानंतर मुंबईला शतकी धावसंख्या पार करता आली. यानंतर झहीर खान (4), जावेद खान (6) व विशाल दाभोळकर (0) यांनी हजेरी लावण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर यजमान संघ बॅकफूटवर फेकला जाणे साहजिक होते. वानखेडेच्या उसळत्या व जलद गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर महाराष्ट्राच्या त्रिकुटाने चांगलीच धमाल नोंदवली.

मुंबईचा दुसरा डाव केवळ 129 धावांमध्ये गारद झाल्यानंतर महाराष्ट्र संघाला विजयासाठी 252 धावांचे आव्हान असताना त्यांनी दिवसअखेर 1 बाद 28 धावांपर्यंत मजल मारली. चिराग खुराना 24 चेंडूत 3 चौकारांसह 17 धावा जमवत झहीरच्या गोलंदाजीवर जाफरकडे झेल दिला.

महाराष्ट्राला आता शनिवारी विजयासाठी आणखी 224 धावांची गरज असून 40 वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबईचे संस्थान खालसा करण्यासाठी त्यांना ही नामी संधी असेल. पण, वानखेडेची खेळपट्टी जलद गोलंदाजीला पोषक असल्याने हे आव्हान देखील फारसे सोपे अजिबात नसेल.

शुक्रवारी दिवसाच्या प्रारंभी, महाराष्ट्राने 7 बाद 219 या कालच्या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली. पण, केवळ 34 मिनिटातच त्यांचे उर्वरित 3 फलंदाज जेमतेम 16 धावांची भर घालत तंबूत परतले. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी नंतर मुंबईची आघाडी फळी अक्षरशः कापून काढताना त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना 10 षटकातच 5 बाद 29 असे खिंडीत पकडले होते.

फल्लाह व संकलेचा यांनी कौस्तुभ पवार (5), वासिम जाफर (0), आदित्य तरे (16), विनित इंदुलकर (4) व अभिषेक नायर (0) यांना तंबूत धाडले. आज दिवसभरात एकूण 14 फलंदाज गारद झाले! यापैकी इंदुलकर व नायर सलग चेंडूंवर तंबूत परतले होते.

Related posts: