|Saturday, April 29, 2017
You are here: Home » Top News » ई-मेल खात्याचा हॅकर सीबीआयच्या ताब्यातई-मेल खात्याचा हॅकर सीबीआयच्या ताब्यात 

EMAIL

वृत्तसंस्था

नवी दिल्ली

अमेरिकी तपास यंत्रणा एफबीआय कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सीबीआयने पुण्यातील एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीने आपल्या ग्राहकांसाठी कथितरित्या जगभरातील 900 पेक्षा जास्त ई-मेल खाती हॅक केली होती.

लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाचा मुलगा असणाऱया अमित तिवारीच्या हालचालींबाबत सीबीआयला एफबीआयकडून माहिती मिळाली होती. तिवारीला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 30 वर्षीय तिवारी 2 वेबसाइट `डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. हायरहॅकर. नेट’ आणि `डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. एनोनिमिटी. कॉम’ च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी कथितरित्या अवैध पद्धतीने ईमेल खात्यांचा पासवर्ड शोधण्याचे काम करत होता. या कामासाठी त्याला 250 ते 500 डॉलर्स दिले जायचे. या दोन्ही वेबसाइटचे सर्व्हर अमेरिकेत आहेत. तिवारीला वेस्टर्न युनियन आणि पेपाल यांच्याद्वारे पैसे दिले जायचे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या लोकांना बेकायदेशीर पद्धतीने ईमेल खाते उघडायचे असे ते तिवारीला त्याच्या वेबसाइटवर संपर्क साधत असत.

प्रारंभीच्या तपासात ही बाब  समोर आली आहे की तिवारीने कथितरित्या फेब्रुवारी 2011 ते 2013 दरम्यान 900 ई-मेल खाती हॅक केली आहेत, त्यात 171 खाती भारतीय लोकांची होती. तिवारीच्या या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी कोणतीही तडजोड तर करण्यात आली नाही ना याचा शोध सीबीआय घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार क्रिकेटच्या इंडियन प्रीमियर लीगशी संबंधित काही लोकांनी तिवारीकडून काम करवून घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पैशांच्या देवाणघेवाणीवरून व्यवहार होऊ शकला नाही. सीबीआय या दाव्यांची पडताळणी करत आहे. सीबीआयने एफबीआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर प्रारंभिक तपास सुरू केला आणि तिवारीला हुडकून काढले. तिवारीला मुंबई पोलिसांनी जवळपास 10 वर्षांपुर्वी एक क्रेडिट कार्ड कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी अटक केली होती. सीबीआयने प्राथमिक पुरावे गोळा केल्यानंतर 2 एफआयआर नोंदविले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयने एफआयआर नोंदविल्यानंतर शनिवारी मुंबई, पुणे आणि गाजियाबादमध्ये त्याचे सहयोगी ग्राहक असल्याच्या संशयावरून छापे टाकले, यावेळी पहिल्यांदाच चीन, रोमानिया आणि अमेरिका या देशातील तपास यंत्रणांकडून याबाबत कारवाई करण्यात आली आहे.

तिवारीचे अमेरिका, रोमानिया आणि चीनमधील हॅकरांच्या समूहासोबत असलेल्या संबंधाबाबत चौकशी करणे गरजेचे आहे कारण त्याचे ग्राहक या देशातील असल्याचे उघड झाले आहे.  सीबीआय एकीकडे भारतात तपास करत आहे तर रोमानियात काबंटिंग ऑर्गनाइज्ड क्राइम विभागाने तर चीनमध्ये जनसुरक्षा मंत्रालयाने याप्रकरणी तपास चालविला आहे.

Related posts: