|Saturday, April 29, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सांगलीचे ‘सं. शारदा’ प्रथमसांगलीचे ‘सं. शारदा’ प्रथम 

NATYA LOGO

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयतर्फे आयोजित 55 व्या संगीत राज्य नाटय़ स्पर्धेत सांगलीतील देवल स्मारक मंदिर नाटय़संस्थेच्या ‘सं. शारदा’ नाटकाने  प्रथम क्रमांक पटकावला आहे. एम.सी.जी.एम. संगीत व कला अकादमी-मुंबईच्या ‘सं. धा†िडला राम तिने का वनी’ नाटकाला द्वितीय, तर रत्नागिरीतील ‘राधाकृष्ण कलामंच’च्या ‘सं. सुवर्णतुला’ ने तिसरा क्रमांक मिळवला.  नाटकासह वैयक्तिक पारितोषिकांचा विचार करता रत्नागिरीला एकूण 5 पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

रत्नागिरीतील स्वातंत्र्यावीर सावरकर नाटय़गृहात सव्वा महिना संगीत नाटय़ स्पर्धा सुरू होती. राज्यातील 31 नाटकांच्या सादरीकरण झाले. यामध्ये सांगलीतील देवल स्मारक मंदिर नाटय़संस्थेचे ‘सं. शारदा’ हे नाटक अव्वल ठरले आहे.

 रत्नागिरीतील ‘राधाकृष्ण कलामंच’च्या ‘सं. सुवर्णतुला’ नाटकाला तृतीय क्रमांकाबरोबर वैयक्तीक तीन पुरस्कार मिळाले आहेत. या नाटकासाठी चित्रकार प्रशांत साखळकर यांना नेपथ्यासाठी द्वितीय क्रमांका, अनुप बापट या युवागायकाला रौप्यपदक, युवा गायिका प्रेरणा दामलेला गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले. अशाप्रकारे तृतीय क्रमांकास ‘सं. सुवर्णतुला’ने वैयक्तिक 3 पारितोषिके पटकावली आहेत. याचबरोबर प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांना पारितोषिक प्राप्त झाले आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणेः- नाटक- प्रथमः- सं. शारदा (75,000 रू.), द्वितीयः- सं. धाडिला राम तिने का वनी (50,000 रूपये), तृतीयः- सं. सुवर्णतुला (25,000 रू.). दिग्दर्शनः- प्रथम (25,000 रू.)- चंद्रकांत धामणीकर (सं. शारदा), द्वितीय (20,000 रू.)- सुवर्णगौरी घैसास (सं. धाडिला राम तिने का वनी), नेपथ्यः- प्रथम (15,000 रू.)- मुकुंद पटवर्धन (सं. कटय़ार काळजात घुसली), द्वितीय (10,000 रू.)- प्रशांत साखळकर (सं. सुवर्णतुला). नाटय़लेखनः- प्रथम (20,000 रू.)- सम्राज्ञी मराठे (सं. अहम् देवयानी), द्वितीय (15,000 रू.)- विद्या काळे (सं. हार-जीत).

संगीत दिग्दर्शनः- प्रथम (15,000 रू.)- अनंत जोशी (सं. शांतीब्रह्म), द्वितीय (10,000 रू.)- जयश्री सबनीस (सं. हार-जीत). संगीतसाथ ऑर्गनः- प्रथम (15,000 रू.)- विशारद गुरव (सं. बावनखणी), द्वितीय- (5,000 रू.)- ओंकार पाठक (सं. हार-जीत). संगीतसाथ तबला :- प्रथम (10,000 रू.)- दत्तराज शेटय़े (सं. एकच प्याला), द्वितीय- (5,000 रू.)- हेरंब जोगळेकर (सं. सौभद्र). संगीत व गायन (रौप्यपदक व 5,000 रू.) :- अनुप बापट (सं. सुवर्णतुला), मिलींद करमरकर (सं. धाडिला राम तिने का वनी), अपर्णा हेगडे (सं. धाडिला राम तिने का वनी), अंकिता आपटे (सं. शारदा). उत्कृष्ट अभिनय (रौप्यपदक व 5,000 रू.) प्रमोद मांद्रेकर (सं. एकच प्याला), नितीन जोशी (सं. कुरूमणी), निवेदिता पुणेकर (सं. ययाती आणि देवयानी), कोमल कोल्हापुरे (सं. लावणी भुलली अभंगाला).

गायनासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे- गायत्री कुलकर्णी (सं. शारदा), शीतल सुवर्णा (सं. सौभद्र), प्रेरणा दामले (सं. सुवर्णतुला), जुई केकडे (सं. हार-जीत), सिद्धी शेलार (सं. ययाती आणि देवयानी), चैतन्य गोडबोले (सं. कटय़ार काळजात घुसली), अभिषेक जोशी (सं. सौभद्र), प्रवीण शिलकर (सं. अहम् देवयानी), सिद्धेश जाधव (सं. शांतीब्रह्म), सागर आपटे (सं. शारदा).

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे :- श्रद्धा जोशी (सं. शारदा), यशश्री जोशी (सं. कटय़ार काळजात घुसली), गौतमी कामत (सं. मत्स्यगंधा), ऐश्वर्या फडके (सं. सरस्वतीच्या साक्षीने), रसिका साळगावकर (सं. ययाती आणि देवयानी), अभय मुळ्ये (सं. सुवर्णतुला), दीपक ओक (सं. शांतीब्रह्म), केदार पावनगडकर (सं. धाडीला राम तिने का वनी), समीर शिरोडकर (सं. अयोध्येचा ध्वजदंड), विजय जोशी (सं. सौभद्र).

2 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत अतिशय जल्लोषात स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण 31 नाटय़प्रयोग सादर झाले. स्पर्धेसाठी चंद्रकांत लिमये, श्रीकांत दादरकर आणि कृष्णा जोशी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

‘रत्नागिरी केंद्र’ कायम करण्याबाबत संभ्रम

संगीत नाटय़ स्पर्धेला रत्नागिरीत रसिकांचा व नाटय़संस्थांचाही सहभाग ऐतिहासिक ठरला. सलग 3 वर्षे रत्नागिरी केंद्रावर स्पर्धा झाली. स्पर्धेच्या अलिखित नियमानुसार यंदा सांगलीचे नाटक प्रथम आल्याने त्या†िठकाणी पुढीलवर्षीचे स्पर्धेचे केंद्र असणार आहे. मात्र आतापर्यंतच्या अनुभवानुसार सांगली केंद्रावर रसिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. तर रसिकांची गर्दी तिथे केंद्र कायम करावे, अशी रंगकर्मी व रसिकांच्या मागणी केल्यानुसार रत्नागिरी केंद्र कायम होण्याबाबत आशा आहे. मात्र संचलनालयाकडून अशाप्रकारचा कोणताही खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे रत्नागिरी केंद्र कायम करण्याबाबत संभ्रम आहे.

Related posts: