|Saturday, April 29, 2017
You are here: Home » Top News » ब्रिटनच्या पंतप्रधानांचा राजीनामाब्रिटनच्या पंतप्रधानांचा राजीनामा 

camerun

ऑनलाईन टीम / मुंबई :

युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहिर केले आहे. कॅमेरून युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याला विरोध होता. त्यांच्या विरोधात मतदान झाल्याने कॅमेरून यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.

महासंघातून बाहेर पडण्याची घोषणा करताना कॅमेरून म्हणाले, देशाला आता नवीन पंतप्रधानाची गरज आहे. पुढील 3 महिन्यात ब्रिटेनला नवीन पंतप्रधान मिळेल. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चांगली आहे. जनमत चाचणीची अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार नाही. तसेच दुसऱया देशातून आलेल्या लोकांवरही कोणतीही कारवाई होणार नाही. ते निश्चिंतपणे येथे राहु शकतात.

कॅमेरून यांनी राजीनामा देऊन सर्वांना धक्का दिला आहे. यामुळे ब्रिटेनमध्ये लवकरच निवडणूकीची रणधुमाली होणार आहे.

Related posts: