|Monday, April 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » रग्बी चॅम्पियनशिपसाठी निगडे व पाटीलची निवडरग्बी चॅम्पियनशिपसाठी निगडे व पाटीलची निवड 

10SANGARUL

वार्ताहर/ सांगरुळ

चीनमधील हाँगकाँग येथे होणाऱया एशियन शालेय रग्बी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी करवीर तालुक्यातील श्रीधर श्रीकांत निगडे (नागदेववाडी) व पृथ्वीराज बाजीराव पाटील (कोपार्डे) यांची भारतीय संघातून निवड झाली आहे.

या स्पर्धा 22 ते 26 जुलै या कालावधीत होणार आहेत. भारतीय संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर 6 ते 20 जुलै या कालावधीत मुंबई जिमखाना मैदान येथे सुरू असून या शिबिरास निगडे व पाटील सहभागी झाले आहेत.

या खेळाडूंना प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, कोल्हापूर रग्बी फुटबॉल असो.चे पेट्रन इन चीफ माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रा. अमर सासने, नरेंद्र खाडे, संदीप मोसमकर, विकास चौरसिया, तानाजी शेंडगे, विकास पाटील यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

Related posts: