|Sunday, January 22, 2017
You are here: Home » क्रिडा » क्विटोव्हावर चाकूहल्लाक्विटोव्हावर चाकूहल्ला 

20spo-06-petra-kvitova

वृत्तसंस्था/ प्राग

झेक प्रजासत्ताकच्या दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱया व जागतिक क्रमवारीत सध्या अकराव्या स्थानावर असणाऱया पेत्र क्विटोव्हावर चाकूधारी घरफोडय़ाने हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे.

मात्र तिची दुखापत गंभीर नसून उपचारानंतर तिला घरी जाऊ देण्यात आले असल्याचे वृत्ती झेक न्यूज एजन्सीने दिले आहे. मंगळवारी सकाळी तिच्या घरात बॉईलर दुरुस्तीचे निमित्त करून आलेल्या घरफोडय़ाने तिच्यावर चाकूहल्ला केला. तिने प्रतिकाराचा प्रयत्न केला त्यावेळी तिच्या डाव्या हाताला जखमा झाल्या. त्या फारशा गंभीर स्वरूपाच्या नसून उपचार करून तिला पाठविण्यात आले असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

Related posts: