|Monday, March 27, 2017
You are here: Home » Top News » युतीसाठी प्रस्ताव आल्यास विचार करेन : राज ठाकरे



युतीसाठी प्रस्ताव आल्यास विचार करेन : राज ठाकरे 

raj-thakre

ऑनलाईन टीम / मुंबई :

युतीसाठी प्रस्ताव आल्यास यावेळी नक्की विचार करेन, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिकेच्या तोंडावर त्यांनी हे विधान केल्याने त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

फेब्रुवारी महिन्यात आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ता काजीब करुन महापालिकेवर कोण येतो, यासाठी विविध पक्ष प्रयत्न करत आहेत. यातच राज ठाकरेंनी युतीबाबतचे हे वक्तव्य केल्याने या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. यासाठी अनेक प्रयत्नही करण्यात आले. मात्र, अद्यापही हे शक्य झाले नाही. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे नेमके कोणासोबत जाणार हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related posts: