|Sunday, February 26, 2017
You are here: Home » उद्योग » क्रेडिट स्कोअरनुसार ठरणार गृहकर्जाचे हफ्तेक्रेडिट स्कोअरनुसार ठरणार गृहकर्जाचे हफ्ते 

hl

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एखाद्या ग्राहकाला कर्ज देताना बँका त्याच्या क्रेडिट स्कोअरचा विचार करत त्याच्या परिणामांचा आढावा घेत होतात. मात्र यानंतर आता क्रेडिट स्कोअरच्या आधारे गृहकर्जाचा ईएमआय (हफ्ते) किती असतील याचा विचार करणार आहेत. ही सेवा सर्वात पहिल्यांदा देण्याचा मान बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेला मिळणार आहे. या बँकेकडून सध्या सर्वात स्वस्त दराने गृहकर्जावर व्याज आकारले जाते. आता गृह कर्जाच्या व्याजदराबरोबर क्रेडिट रेटिंगलाही जोडण्यात येण्याची तयारी सुरू आहे.

बँक ऑफ बडोदा गृह कर्जाच्या व्याजदरावर क्रेडिट स्कोअरला जोडणार आहे. यासाठी बँकांकडून आता क्रेडिट इन्फर्मेशन ब्यूरो ऑफ इंडियाच्या क्रेडिट स्कोअरचा आधार घेण्यात येणार आहे. यानुसार ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर 760 गुणांपेक्षा जास्त असणार, त्या व्यक्तीला गृह कर्जासाठी 8.35 टक्के दराने व्याज चुकवावे लागणार आहे. 725 ते 759 गुण असणाऱयांना 8.85 टक्के आणि 824 पेक्षा कमी गुण असणाऱयांना 9.35 टक्क्यांनी व्याज आकारण्यात येईल.

जे पहिल्यांदाच कर्ज घेत आहेत आणि ज्यांचे कोणतेही पेडिट स्कोअर नाही, त्यांना बँक 8.85 टक्क्यांने कर्ज देईल. लवकर अन्य बँका यानुसार कर्ज वितरित करतील असा अंदाज आहे. नवीन व्याजदरामध्ये कर्जाची रक्कम आणि मुदत यांचा कोणताही संबंध नसेल. कोणताही व्यक्ती कितीही वर्षासाठी गृहकर्ज घेत असेल तर त्यासाठी नवीन पेडिट स्कोअरचा आधार घेण्यात येईल.

पेडिट स्कोअर कसा निर्धारित होतो ?

कोणत्याही व्यक्तीचा सिबिल स्कोअर किती आहे हे त्या व्यक्तीकडे कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे, यावर अवलंबून असते. सर्व बँकांना आपल्या ग्राहकांचा कर्ज इतिहास सिबिल, क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरोला सादर करावा लागतो. याच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा पेडिट स्कोअर तयार होतो.

Related posts: