|Wednesday, March 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » डिसेंबर महिन्यात आधार नोंदणीत 60 टक्के वाढडिसेंबर महिन्यात आधार नोंदणीत 60 टक्के वाढ 

aadhar

नवी दिल्ली

 जेव्हापासून सरकारने नोटाबंदीची घोषणा केली आहे, तेव्हापासून देशात अनेक प्रकारचे बदल पाहावयास मिळत आहेत. रोकडविरहित यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी बँक व्यवहार आणि जवळपास सर्व कामांसाठी सध्या आधारकार्डची नोंदणी अनिवार्य ठरू लागली आहे. हे पाहता लोक आधार नोंदणीबाबत खूपच सतर्क झाले आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयईडीएआय) च्या नव्या अहवालानुसार केवळ डिसेंबर महिन्यात आधार नोंदणीत 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात 12.19 लाख लोकांनी आधारसाठी नोंदणी करविली. परंतु नोव्हेंबरमध्ये हा आकडा खाली आला. केवळ 10.49 लोकांनी नोव्हेंबरमध्ये आधारसाठी नोंदणी केली होती. तर डिसेंबर महिन्यात यात तेजी दिसून आली. डिसेंबरमध्ये  देशभरातील 16.05 नागरिकांनी आपल्या आधारसाठी नोंदणी केली. लोक आपल्या आधारच्या नोंदणीकरता खूपच सतर्क झाले आहेत. जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात 3.63 लाख लोकांनी आपल्या आधारची नोंदणी करविली. नोटाबंदीनंतर आधार, बँक व्यवहार आणि उर्वरित कामांसाठी एक ठोस दस्तऐवज असल्याचे लोकांना उमगले आहे. यामुळेच हा बदल दिसून येत असल्याचे प्राधिकरणाच्या एका अधिकाऱयाने म्हटले.

 

Related posts: