|Saturday, April 29, 2017
You are here: Home » Automobiles » रोयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी होंडा ‘बुलेट’ बनवणाररोयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी होंडा ‘बुलेट’ बनवणार 

Honda_Royan_Enfield

ऑनलाईन टीम /मुंबई :

दमदार आणि स्टायलिश बाई बनवणारी कंपनी रॉयल एन्फिल्डला नवा प्रतिस्पर्धी मिळण्याची शक्यता आहे. होंडा आता पॉवरफुल बाईक सेगमेंटमध्ये उतरणार असून आता बुलेट बनवणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

आता सीबीआरपेक्षा एक पाऊल पुढे जात होंडा अशी बाईक आणणार आहे,जी दिसायला मोठी असेल त्यासोबतच पॉवरफुलही असेल, एशियन होंडा मोटर्स कंपनी लिमिटेडसंचालक नेरिअक आबे यांच्या माहितीनुसार, ‘कंपनीने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी नवी टीम स्थापन केली आहे. या टीममध्ये थायलंड आणि जपानच्या निवडक तज्ञांचा समावेश आहे, ज्यांना भारतात येऊन बाईक डिझाईन करण्यास सांगितले आहे. ‘जर कंपनीने भारतात याचे उत्पादन केले , तर त्यांची जपानमध्येही निर्यात केली जाईल’असेही नेरिअक आबे यांनी सांगितले. होंडाजवळ आधीपासूक 300-500 सीसीमध्ये दो बाईक आहेत. अमेरिकन बाजारात या बाईक मागील अनेक काळापासून वापरात आहेत. आता पॉवरफुल बाईक आणून रॉयल एन्फिल्डला टक्कर कशी देता येईल, यावर कंपनीचे लक्ष आहे.

 

 

Related posts: