|Saturday, April 29, 2017
You are here: Home » उद्योग » सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात घसरण



सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात घसरण 

VIEW OF BOMBAY STOCK EXCHANGE, INDIA'S OLDEST STOCK EXCHANGE.

बीएसईचा सेन्सेक्स 130, एनएसईचा निफ्टी 33 अंशाने घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात कमजोरी आल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्यांनी कमजोर होत बंद झाले. कमजोरी आल्याने निफ्टी 9,125 च्या आसपास बंद झाला, तर सेन्सेक्स 130 अंशाने घसरला.

बीएसईचा सेन्सेक्स 130 अंशाने घसरत 29,518 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 33 अंशाने घसरत 9,126 वर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात काही प्रमाणात खरेदी झाली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.4 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.3 टक्यांनी वधारला.

आयटी, बँकिंग, भांडवली वस्तू आणि तेल आणि वायू समभागात विक्री झाल्याने दबाव दिसून आला. बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी घसरत 21,110 वर बंद झाला. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरला. बीएसईचा भांडवली वस्तू निर्देशांक 0.4 टक्के आणि तेल आणि वायू समभागात 0.5 टक्क्यांनी कमजोरी आली. मात्र औषध, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागात खरेदी दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

अरबिंदो फार्मा, ग्रासिम, आयशर मोटर्स, भेल, टाटा पॉवर, एनटीपीसी, भारती एअरटेल, कोल इंडिया आणि एचडीएफसी बँक 2.5-0.6 टक्क्यांनी वधारले. आयडिया सेल्युलर, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो 9.6 टक्यांनी घसरत बंद झाले.

मिडकॅप समभागात ओरिएन्टल बँक, डिवीज लॅब, टोरेन्ट पॉवर, युनियन बँक आणि आयडीबीआय बँक 4.3-2.2 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात रेप्रो इंडिया, फेअरकेम, स्मार्टलिंक नेट, बॉम्बे डाईंग आणि संदूर मॅगनीज 20-8.5 टक्क्यांनी वधारले.

मिडकॅप समभागात इंडियन बँक, श्रीराम सिटी, ग्लॅक्सो कंम्युमर, कन्साई नॅरोलॅक आणि एसजेव्हीएन 4.7-1.7 टक्क्यांनी कमजोर झाले. स्मॉलकॅप समभागात डेल्टा कॉर्प, फ्लेक्सिटफ इन्टरनॅशनल, इंडियाबुल्स व्हेन्चर्स, रेप्को होम आणि सोनाटा 5.85-4.5 टक्क्यांनी घसरले.

Related posts: