|Saturday, April 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » योगींकडून पारदर्शकतेची शपथयोगींकडून पारदर्शकतेची शपथ 

Lucknow: UP Chief Minister Yogi Adityanath with Deputy CMs Dinesh Sharma and Keshav Prasad Muriya at a meeting of police officers at Lok Bhawan in Lucknow on Monday. PTI Photo(PTI3_20_2017_000173B)

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱयांची भेट : 15 दिवसात संपत्तीचा तपशील द्यावा लागणार

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेश सरकारचे कामकाज स्वीकारल्यानंतर सोमवारी योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव आणि वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱयांसोबत बैठक घेतली. लखनौतील लोकभवन येथे योगींनी सर्व अधिकाऱयांना शपथ घ्यायला लावली. पारदर्शकता, स्वच्छता आणि स्पष्टतेची शपथ योगींनी अधिकाऱयांना दिली. तसेच पुढील वाटचालीविषयी सर्व अधिकाऱयांशी चर्चा केली. योगी सरकारने 100 दिवसांच्या अजेंडय़ावर काम सुरू केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व अधिकाऱयांना 15 दिवसात संपत्तीचा तपशील देण्याचा निर्देश दिला. भाजपचा संकल्पपत्र वाचावा आणि तो लागू करावा असे आदित्यनाथ यांनी अधिकाऱयांना सांगितले. बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सर्व विभागांचे सचिव, विशेष सचिव सामील झाले. सरकारच्या प्राधान्यक्रमानुसार योजना आणि गरजांची पूर्ण रुपरेषा तयार करण्याचा आदेश बैठकीत सरकारकडून देण्यात आला.

याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यात खातेवाटपाविषयी चर्चा झाली. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाटय़ाला वित्त आणि गृहविभाग येण्याची शक्यता आहे. हृदयनारायण दीक्षित यांना विधानसभेचा सभापती बनविले जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री मौर्य यांनी दिली.

निवासस्थानाचे शुद्धिकरण

लखनौच्या 5 कालिदास मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची नेमप्लेट देखील बदलण्यात आली आहे. परंतु योगी अजूनही तेथे राहण्यासाठी गेलेले नाहीत. मुख्यमंत्री निवासस्थानाचे योगींच्या गृहप्रवेशापूर्वी शुद्धिकरण करण्यात आले आहे. गोरखपूरहून आलेल्या 11 ब्राह्मणांनी सोमवारी तेथे होमहवन-पूजन केले. निवासस्थानाच्या चारही बाजूंना स्वस्तिक काढण्यात आले.

दोन कत्तलखाने बंद

रविवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर योगींनी त्वरित निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. यानुसार सोमवारी अलाहाबादमधील दोन कत्तलखाने बंद करण्यात आले. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि स्वतः योगींनी निवडणूक प्रचारावेळी सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. उत्तरप्रदेशातील कत्तलखाने बंद करू अशी घोषणा भाजपने केली होती.

लाल दिव्यास नकाराची शक्यता

योगी राज्यात व्हीव्हीआयपी संस्कृतीवर वार करणार असल्याचे वृत्त आहे. योगी आणि त्यांचे मंत्री आपल्या वाहनांमध्ये लाल दिव्याचा वापर करणार नसल्याचे वृत्त असून याची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील लाल दिवा नाकारला आहे.

 रोमियोविरोधी पथक लवकरच

सरकार 100 दिवसांचा अजेंडा तयार करत आहे. यांतर्गत शेतकऱयांना कर्जमाफी, कत्तलखान्यांवर बंदी आणि महिला सुरक्षा हे मुख्य मुद्दे असतील. यामुळे यावर सर्वात आधी काम सुरू केले जात आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात रोमियोविरोधी पथकाच्या स्थापनेचे आश्वासन भाजपने प्रचारात दिले होते. हे आश्वासन लवकरच पूर्ण केले जाईल असे मौर्य यांनी सांगितले आहे.

Related posts: