|Monday, April 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » संकुलाच्या गच्चीवरील आगप्रकरणी खुलासा द्या!संकुलाच्या गच्चीवरील आगप्रकरणी खुलासा द्या! 

burning logo

प्रतिनिधी / रत्नागिरी

झोपेचे सेंग घेतलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कोल्हापूर विभागाला अखेर जाग आली आहे. दोन महिन्यांपूर्वी क्रीडा संकुलाच्या गच्चीवर लागलेल्या आगप्रकरणी खुलासा द्या, असे आदेश देण्यात आले आहेत. तसे पत्र गेल्या पाच वर्षातील दोन्ही जिल्हा क्रीडा अधिकाऱयांना पाठवण्यात आल्याचे कोल्हापूर विभागीय उपसंचालक आनंद व्यंकटेश्वर यांनी सांगितले.

जानेवारी महिन्यात जिल्हा क्रीडा संकुलाच्या गच्चीवर आग लागल्याची घटना घडली होती. 2012 साली बॅडमिंटन हॉलमधील वुडन कोर्टचे स्वरूप बदलल्यावर गच्चीवर रचून ठेवण्यात आलेली ही लाकडे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, साडेचार वर्षे ही लाकडे अशीच का पडून ठेण्यात आली, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता. आग लागल्यानंतर या लाकडांची निरगत लावण्यासाठी मूल्यांकनाचे गुऱहाळ सुरू असतानाच तब्बल साडेचार वर्षापूर्वीच लाकडांचे मूल्यांकन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली होती. 2012 साली या लाकडांचे मूल्याकंन करून आयटीआयने तसे पत्र क्रीडा कार्यालयात दिले होते.

या पार्श्वभूमीवर मूल्यांकन करूनही लाकडे तशीच पडून का ठेवली, साडेचार वर्षांपूर्वीच मूल्यांकन केल्यावर पुन्हा मूल्यांकन करण्याची गरज का पडली, एका मूल्यांकन अहवालात मूल्य निश्चिती तर आगीनंतरच्या मूल्यांकनात ही लाकडे निरूपयोगी ठरल्याने नेमके नुकसान किती झाले, 2012 सालीच केलेल्या लाकडांच्या मूल्यांकनात नगांची संख्याच का निश्चित केली नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. जानेवारी 2017 महिन्यात ‘तरूण भारत’च्या अंकांमधून 5 वृत्तांमध्ये या विषयी सविस्तर मांडणी करण्यात आली होती.

या वृत्तांचा विचार करून याबाबत खुलासा करण्याचे आदेश 2012 ते 2017 या कालावधीतील रत्नागिरीतील जिल्हा क्रीडाधिकाऱयांना देण्यात आले असल्याचे व्यंकटेश्वर यांनी सांगितले. यामध्ये विद्यमान जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षीत व सध्या वर्धा येथे कार्यरत असलेले नितीन तारळकर यांचा समावेश आहे. दिक्षीत 2012 साली, पुढे 3 वर्षे तारळकर व त्यानंतर पुन्हा दीक्षित गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. 18 मार्च रोजी या बाबतचे आदेश देण्यात आले असून या दोन्ही अधिकाऱयांनी 7 दिवसात याचे उत्तर पाठवणे अपेक्षित असल्याचेही उपसंचालक व्यंकटेश्वर यांनी सांगितले.

Related posts: