|Saturday, April 29, 2017
You are here: Home » leadingnews » आशिष शेलार, विजयकुमार गावित यांची लागणार मंत्रिपदी वर्णी ?आशिष शेलार, विजयकुमार गावित यांची लागणार मंत्रिपदी वर्णी ? 

ashish

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विजयकुमार गावित यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समावेश होणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवडय़ात होणार असून, या विस्तारात शेलार आणि गावित यांचा समावेश होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीचे सरकार असताना आदिवासी विकासमंत्री होते. त्यादरम्यान, मुलांच्या साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप खुद्द भाजपच्या नेत्यांनीच केला होता. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना आता थेट मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts: