|Saturday, April 29, 2017
You are here: Home » उद्योग » ताज मानसिंग हॉटेलचा होणार लिलावताज मानसिंग हॉटेलचा होणार लिलाव 

taj-mansingh-taj-mahal-hotel_650x400_71492670392

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

गेल्या काही दशकांपासून टाटा समूह चालवित असणाऱया ताज मानसिंग हॉटेलचा लिलाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. नवी दिल्ली महापालिका मंडळाला या पंचतारांकित हॉटेलची आता विक्री करता येणार आहे. टाटा समुहाजवळ या हॉटेलची विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही, हा महापालिका मंडळाचा एनडीएमसी अपील स्वीकारण्यात आला आहे.

ई-लिलावाच्या कालावधीत विक्री न झाल्यास हॉटेल खाली करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात येईल. ल्युटियन्स झोनमध्ये असणाऱया या हॉटेलची मालकी एनडीएमसीजवळ आहे. एनडीएमसीने हे हॉटेल 33 वर्षासाठी टाटा समुहाच्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिले होते. या कराराची मुदत 2011 मध्ये संपली होती. मात्र इंडियन हॉटेलच्या मागणीनुसार कालावधी 9 वेळा वाढवून देण्यात आला होते. यानंतर जानेवारी 2016 मध्ये एनडीएमसीने लिलाव प्रक्रियेला प्रारंभ केला होता. त्याविरोधात इंडियन हॉटेलने न्यायालयात धाव घेतली होती. आता होणाऱया ई-लिलावात कंपनी भाग घेणार आहे, असे इंडियन हॉटेलच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

Related posts: