|Saturday, April 29, 2017
You are here: Home » उद्योग » पाच सत्रांच्या दबावानंतर बाजारात तेजीपाच सत्रांच्या दबावानंतर बाजारात तेजी 

VIEW OF BOMBAY STOCK EXCHANGE, INDIA'S OLDEST STOCK EXCHANGE.

मुंबई  /  वृत्तसंस्था :

गुरुवारी बाजारात चांगली तेजी दिसून आली. निफ्टीच्या पाच दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.25 टक्यांनी वधारत बंद झाले. सेन्सेक्स 29,400 आणि निफ्टी 9,135 च्यावर बंद झाला.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 86 अंशाने वधारत 29,422 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 33 अंशाने मजबूत होत 9,136 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 0.9 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.1 टक्क्यांनी वधारला.

वाहन, एफएमसीजी, आयटी, मीडिया, स्थावर मालमत्ता, पीएसयू बँक, ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांवडली वस्तू समभागात सर्वात जास्त खरेदी झाली. निफ्टीचा ऑटो निर्देशांक 0.8 टक्के, एफएमसीजी 0.5 टक्के, आयटी निर्देशांक 1 टक्के, मीडिया निर्देशांक 2 टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक 0.9 टक्क्यांनी वधारला. बीएसईचा स्थावर मालमत्ता निर्देशांक 2.1 टक्के, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक 1.25 टक्के आणि भांडवली वस्तू निर्देशांक 0.7 टक्क्यांनी मजबूत झाले.

बँक निफ्टी 0.3 टक्क्यांनी घसरत 21,500 वर बंद झाला. निफ्टीचा खासगी बँक निर्देशांक 0.7 टक्क्यांनी कमजोर झाला. औषध, ऊर्जा, तेल आणि वायू, धातू निर्देशांकात दबाव दिसून आला.

दिग्गज समभागांची कामगिरी

ग्रासिम, बँक ऑफ बडोदा, इंडियाबुल्स हाऊसिंग, जी एन्टरटेनमेन्ट, अदानी पोर्ट्स, गेल, एचडीएफसी, एशियन पेन्ट्स आणि मारुती सुझुकी 6-1.2 टक्क्यांनी वधारले. येस बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, आयओसी, टाटा पॉवर, सन फार्मा, एनटीपीसी आणि कोल इंडिया 3.75-0.8 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात सन टीव्ही, एनएलसी इंडिया, ओबेरॉय रियल्टी, एमआरपीएल आणि भारत फोर्ज 6.1-3.4 टक्क्यांनी वधारले. स्मॉलकॅप समभागात जय भारत मारुती, किटेक्स गारमेन्ट, ओके प्ले, भूषण स्टील आणि रेडिको खेतान 20-11.5 टक्क्यांनी मजबूत झाले.

 

Related posts: