|Saturday, April 29, 2017
You are here: Home » क्रिडा » मरे, वावरिंकाचे आव्हान समाप्तमरे, वावरिंकाचे आव्हान समाप्त 

ANDY MURY

वृत्तसंस्था /मोनॅको, माँटे कार्लो :

अग्रमानांकित ब्रिटनच्या अँडी मरेने निर्णायक सेटमध्ये मिळालेली 4-0 ची आघाडी वाया घालविल्यामुळे येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत तिसऱया फेरीतच त्याचे आव्हान संपुष्टात आले. त्याचप्रमाणे वावरिंकाचे आव्हानही तिसऱया फेरीतच समाप्त झाले.

पंधराव्या मानांकित अल्बर्ट रॅमोस विनोलासकडून त्याला 2-6, 6-2, 7-5 असा पराभव स्वीकारावा लागला. हाताच्या कोपराला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर मरेने या स्पर्धेत पुनरागमन केले होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या सामन्यात सर्व्हिस करताना त्याला संघर्ष करावा लागला. रॅमोस विनोलासची उपांत्यपूर्व लढत पाचव्या मानांकित मारिन सिलिकशी होईल. क्रोएशियाच्या सिलिकने नवव्या मानांकित टॉमस बर्डीचचा 6-2, 7-6 (7-0) असा पराभव करून शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. अन्य एका सामन्यात लुकास पौलीने पात्रता फेरीतून आलेल्या ऍड्रियन मॅनारिनोवर पहिल्या सेटमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली असताना मॅनारिनोने माघार घेतल्याने त्याला पुढे चाल मिळाली.

तिसरे मानांकन असलेल्या स्वीत्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाचे आव्हानही तिसऱया फेरीत संपुष्टात आले. त्याला 16 व्या मानांकित पाब्लो क्मयुव्हेसने 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

Related posts: