|Saturday, April 29, 2017
You are here: Home » Top News » लातूरमध्ये कमळ पहिल्यांदाच ‘फुलले’लातूरमध्ये कमळ पहिल्यांदाच ‘फुलले’ 

bjp-election

ऑनलाईन टीम / लातूर :

लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल येण्यास सुरूवात झाली असून काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱया लातूरमध्ये भाजपचे कमळ पहिल्यांदाच ‘फुलले’ आहे.

गेल्या काही वर्षांपासून लातूरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. लातूर हा काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली होती. मात्र, आता भाजपने लातूर महानगरपालिकेत देखील चांगली मुसंडी मारत महापालिकेच्या 70 जागांपैकी 38 जागांवर विजय मिळवला. तसेच काँग्रेसला अवघ्या 31 जागांवर समाधान मानावे लागले. याचबरोबर राष्ट्रवादी 01 जागी विजय मिळवला. त्यामुळे आता लातूर महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या भाजपकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related posts: