|Saturday, April 29, 2017
You are here: Home » विविधा » शेतकऱयांसाठी फक्त एक रूपयात जेवणशेतकऱयांसाठी फक्त एक रूपयात जेवण 

Unhealthy-Food-Puri-Bhaji-580x395

ऑनलाईन टीम / बीड :

दिवसोंदिवस महागाई वाढत चालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे बाहेर जेवायला जाताना किमान 100 – 200 रूपये तरी लागतात. मात्र हेच जेवण जर 1 रूपयात दिले तर…? यावर विश्वास बसणार नाही परंतु हे जेवण केवळ शेतकऱयांसाठी असून बीडमधील बाजार समितीत फक्त 1 रूपयात पोटभर जेवण शेतकऱयांसाठी उपलब्ध केले आहे.

भाजी , चपाती , वरण यांसोबत पापड आणि पिण्यासाठी फिल्टरचे पाणी, हे सगळे केवळ एक रूपयात मिळत आहे. शेतीमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱयांना दिवसभर बाजार समितीच्या आवारात थांबावं लागते. यावेळी शेतकऱयांच्या जेवणाचे हाल होतात. यावर उपाय म्हणून माजलगाव बाजार समितीने एक रूपयात जेवण हा उपक्रम राबवला. माजलगाव शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर ही बाजार समिती आहे. त्यामुळे सकाळी आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱयाला आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी दुपार होताच. त्यातच जवळ जेवणासाठी कोणतेही हॉटेल नाही म्हणून शेतकऱयासाठी एक रूपयात जेवण मिळू लागल्याने स्वस्तात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला, हे जेवण करण्यासाठी मात्र शेतकऱयाला मालाची पोचपावती दाखवणे बंधनकारक आहे.

 

Related posts: