|Saturday, April 29, 2017
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बोको हराम दहशतवाद्यांच्या हल्ल्यात नायजेरियात 60 ठारबोको हराम दहशतवाद्यांच्या हल्ल्यात नायजेरियात 60 ठार 

boko haram 1

कानो / वृत्तसंस्था

कॅमेरून देशाच्या सीमेनजीक असलेल्या व ईशान्य नायजेरियातील बोर्नो राज्यात बोको हराम या दहशतवादी इस्लामी संघटनेने 60 नागरिकांचा बळी घेतला, अशी माहिती स्थानिक अधिकाऱयांकडून देण्यात आली. बोको हरामच्या बंडखोर दहशतवाद्यांनी अमचाका आणि परिसरातील गावावर सोमवारी हल्ला चढविला. अत्यंत आधुनिक स्फोटके त्यांनी घरात टाकल्याने त्यांना आग लागली, असे बाबा शेहू गुलुंबा या स्थानिक बामा प्रशासनाच्या अधिकाऱयाने सांगितले. गोंधळलेल्या रहिवाशांवर स्वैर गोळीबार केल्याने 60 व्यक्ती प्राणास मुकल्या तर अनेक जखमी झाल्या, अशी माहिती गुलुंबाने मैदुगुरी याने दिली. ट्रक, मोटारसायकली व शस्त्रसज्ज दोन वाहनांचा उपयोग करून त्यांनी गोळीबारासह घरांना आगी लावण्याचे प्रकार केल्यावर पलायन केले, असे तो म्हणाला.

Related posts: