|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » क्रिडा » डेव्हिस चषक संघात युकी भांब्रीची निवडडेव्हिस चषक संघात युकी भांब्रीची निवड 

Yuki Bhambri 14814

 वृत्तसंस्था / बेंगळूर :

युवा टेनिसपटू युकी भांब्रीने गेल्याच आठवडय़ात वॉशिंग्टनमधील स्पर्धेतून पुनरागमन केले असून सर्बियाविरुद्ध होणाऱया डेव्हिस चषक प्लेऑफ लढतीसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

22 वर्षीय भांब्री दुखापतीमुळे पाच महिने टेनिसपासून दूर राहिला होता. बुसान येथे झालेल्या कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत तो सहभागी झाला नव्हता. भारताने ती लढत 3-1 अशी जिंकली होती. सर्बियाविरुद्धच्या लढतीसाठी भारतीय संघात सोमदेव देववर्मन, रोहन बोपण्णा, साकेत मायनेनी यांचाही समावेश आहे. रामकुमार रामनाथन व जीवन नेडुनचेझियान यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. सनम सिंग बेंगळूरमध्ये दाखल होऊन संघासोबत सराव करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण कोरियातील इंचेऑन येथे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी रवाना होणार आहे.

Related posts: