|Sunday, May 28, 2017
You are here: Home » क्रिडा » भारत-चीन हॉकी लढत आजभारत-चीन हॉकी लढत आज 

hocky

इंचेऑन / वृत्तसंस्था :

17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात आपले आव्हान जीवंत ठेवण्यासाठी भारतीय हॉकी संघाला शनिवारी येथे होणाऱया ब गटातील शेवटच्या महत्वाच्या सामन्यात विजय मिळविण्याची नितांत गरज आहे. हा सामना किमान बरोबरीत राखला तरी भारताला पुढील फेरीबाबत आशा बाळगता येईल.

या गटातील यापूर्वीच्या सामन्यात पाकिस्तानकडून भारताला 2-1 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. सरदारसिंगच्या भारतीय संघाची या पराभवामुळे थोडी पिछेहाट झाली आहे. ब गटातील होणाऱया या शेवटच्या सामन्यात भारताने मोठय़ा फरकाने विजय मिळविला तर ते अधिकच चांगले आहे पण संभाव्य पराभवामुळे भारताचे आव्हान धोक्यात येऊ शकेल. चीनबरोबरचा सामना बरोबरीत राखला तरी भारताला या क्रीडाप्रकारात सरस गोल सरासरीच्या गोलावर उपांत्य फेरी गाठता येईल. ब गटात सध्या भारत दुसऱया स्थानावर आहे. अ गटात दक्षिण कोरियाचा संघ आघाडीवर आहे.

 

Related posts: