|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठी कागदपत्रे देण्याच्या मागणीवरून ता.पं.मध्ये गोंधळमराठी कागदपत्रे देण्याच्या मागणीवरून ता.पं.मध्ये गोंधळ 

TALUKA PANCHAYAT

प्रतिनिधी / बेळगाव

विविध विभागातील सर्वच कागदपत्रे मराठीतून देण्याची मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तालुका पंचायतीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. मात्र वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आमदार संभाजी पाटील यांनी घटनात्मक तरतुदीनुसार आपण या सदस्यांची मागणी मान्य करावी, अशी सूचना अधिकाऱयांना केली. यावेळी उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे यांनी मागील बैठकीवेळी मराठीतून कागदपत्रे देण्याबाबत ग्वाही दिली होती. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. यामुळे काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

 बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार संभाजी पाटील होते. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, रमेश कळसण्णावर, तालुका पंचायत अध्यक्षा मल्लव्वा बुड्री, उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे, तहसीलदार प्रीतम नसलापुरे, तालुका पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुमार हालसुडे होते.

  जोपर्यंत अधिकाऱयांकडून मराठीतून कागदपत्रे दिली जात नाहीत तोपर्यंत पुढील बैठक होणार नसल्याचा पवित्रा सदस्यांनी घेतला होता. याला अनुसरून उपाध्यक्ष यल्लाप्पा गावडे यांनीही याला संमती दर्शविली होती. यामुळे या बैठकीत पुन्हा सुनीता बुवा, कमल मन्नोळकर, तुळसा पाटील तसेच सुरेश राजुकर, रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी आवाज उठविला.

 वारंवार सांगूनही आपल्याला मराठीत कागदपत्रे का दिली जात नाहीत? असा प्रश्न त्यांनी अधिकाऱयांना केला. यावेळी  अधिकाऱयांनी पुढील वेळी आपण नक्कीच कागदपत्रांचा पुरवठा करू, असे आश्वासन दिले.

Related posts: