|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मागण्या मान्य होईपर्यंत सीएसटी रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीममागण्या मान्य होईपर्यंत सीएसटी रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहीम 

DSC_0542 d

कोल्हापूर / प्रतिनिधी

अपंगांच्या कल्याणसाठी 1995 साली धोरण निश्चित करण्यात आले. पण या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अपंगासाठी असलेला 3 टक्के निधी खर्च केला जात नाही. अशा अपंगांच्या काही मागण्या आहेत. या मागण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या वतीने 23 फेब्रुवारी पासून मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी शासनाला 5 फेब्रवारी पर्यंत मुदत देण्यात येत आहे. शासनाने दखल न घेतल्यास मागण्या मान्य होईपर्यंत गांधीगिरी पध्दतीने मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून सकारात्मक आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी कोल्हापूरात अपंगांच्या मेळाव्यात दिला.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन व पॅरालिंपिक स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने उद्यमनगरातील सामाणी हॉल येथे आमदार बच्चू कडू यांचा सत्कार व अपंग मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कडू म्हणाले, प्रहार अपंग संस्थेची दोन वर्षापूर्वी स्थापना झाली. या दोन वर्षात संस्थेने मिळवलेले  यश वाखाणण्यासारखे आहे. पण अद्याप अपंगांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. अपंगाना कर्ज दिले जात नाही. अंपंगांचा फायदा मिळत नसल्याने राजकीय मंडळी त्यांना मदत करत नाहीत. पण अपंग बांधव प्रामाणिक व विश्वासू असून या बळावर यश मिळवण्याची त्यांच्यात ताकद आहे. या ताकदीवरच पुढची लढाई लढायची आहे. माण्यासंदर्भात 5 फेब्रुवारी पर्यंत सरकारला मुदत देण्यात येत आहे. या मुदतीत सरकारने दुर्लक्ष केल्यास 23 फेब्रुवारी पासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वेस्थानकात मागण्या मान्य होईपर्यंत स्वच्छता मोहीम राबवणार. त्याचीही दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांचा बंगला रंगवण्याचे आंदोलन हाती  घेतले जाईल. प्रत्येक अपंगांची नोंद झाली पाहिजे, दोन वर्षाचा 3 टक्के अनुशेष तातडीने मिळावा, अपंगांचे पगार थांबवू नयेत अशा मागण्या आहेत.

यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड विवेक घाटगे, रामदास म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. संघटनेच्या वतीने आमदार बच्चू कडू व नयना कडू यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने, उपाध्यक्ष युनुस शेख, जिल्हा अध्यक्षा रुपाली पाटील, धर्मेद्र सातव, श्रीकांत पुंदे, ऍड बी.जी. चौगुले, संजय पवार, अभय पोवार, उत्तम दुधाणे यांच्यासह अपंग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts: