|Sunday, May 28, 2017
You are here: Home » क्रिडा » तामिळनाडूची संथ सुरुवात, विजय शंकरचे अर्धशतकतामिळनाडूची संथ सुरुवात, विजय शंकरचे अर्धशतक 

25spo-04-Vijay Shankar acknowledging=1

वृत्तसंस्था/ कोलकाता

रणजी करंडक उपांत्य लढतीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राविरुद्ध खेळताना तामिळनाडू संथ प्रारंभ केला असून दिवसअखेर त्यांनी 87 षटकांत 3 बाद 192 धावा जमविल्या होत्या त्यावेळी दिनेश कार्तिक (48) व विजय शंकर (56) खेळत होते.

तामिळनाडूने प्रथम फलंदाजी स्वीकारली पण महाराष्ट्राच्या अचूक माऱयापुढे त्यांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. अतिसावध पवित्राही त्यांना नडला. अभिनव मुकुंदने 79 चेंडूत 23, कसोटीवीर मुरली विजयने 109 चेंडूत 28, बाबा अपराजितने 81 चेंडूत 20 धावा जमविल्या. 3 बाद 90 अशा स्थितीनंतर दिनेश कार्तिक व विजय शंकर यांनी चौथ्या गडय़ासाठी 102 धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. कार्तिकने 156 चेंडूंच्या खेळीत 8 चौकारांसह नाबाद 48 तर विजय शंकरने थोडा जलद खेळ करीत 97 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 56 धावा जमविल्या आहेत. महाराष्ट्रतर्फे संकलेचा, जोसेफ, फाला यांनी एकेक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू प.डाव 87 षटकांत 3 बाद 192 (मुकुंद 23, मुरली विजय 28, अपराजित 20, कार्तिक खेळत आहे 48, विजय शंकर खेळत आहे 56, अवांतर 17, फाला 1-48, संकलेचा 1-37, जोसेफ 1-38).

Related posts: