|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुबोध भावे-मृण्मयी देशपांडे यांचा आज संवाद कार्यक्रमसुबोध भावे-मृण्मयी देशपांडे यांचा आज संवाद कार्यक्रम 

mrunmayee-deshpande-unseen-photos-saree=1

प्रतिनिधी / बेळगाव

बालगंधर्व, लोकमान्य यासह अनेक मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेले सुबोध भावे, तसेच कुंकू या मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या मृण्मयी देशपांडे शनिवार दि. 31 रोजी बेळगावला येत आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी, क्वेस्ट टूर्स व तरुण भारत यांच्यातर्फे सकाळी 11.15 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी बेळगावकरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या संगीत रंगभूमीत अजरामर ठरलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित चित्रपटात सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

झी स्टुडिओ आणि श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनय सुबोध भावे यांनी केले आहे. संगीत क्षेत्रात लोकप्रिय असलेले गायक शंकर महादेवन यांनी या चित्रपटात अभियन केला आहे. त्यांच्यासह सचिन पिळगावकर, अमृता खानविलकर, पुष्कर श्रोत्री यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटात 21 गाणी असून लागी करजवॉ मे कटार व सूर निरागस हो ही गाणी सध्या विशेष लोकप्रिय झाली आहेत. चित्रपटाचे गायक मंगेश काळे हे यावेळी चित्रपटातील गीत सादर करणार आहेत. लोकमान्य रंगमंदिरमध्ये या चित्रपटाचे कलाकार प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Related posts: