|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » Top News » परभणीचा कुख्यात गुंड मेहबूब पठाण जेरबंदपरभणीचा कुख्यात गुंड मेहबूब पठाण जेरबंद 

mehboob

 ऑनलाईन टीम / परभणी :

परभणी येथील विद्या देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कुख्यात गुंड मेहबूब पठाण याला त्याच्या राहत्या घरातून जेरबंद करण्यात पालिसांना यश आले. त्यामुळे परभणीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

2003मध्ये परभणीतील विद्या देशमुख या महाविद्यालयीन तरूणीवर मेहबूब पठाण याने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात पठाण नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आजारपणाचा बहाणा करून तो शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल झाला. त्यावेळी पोलिसांची नजर चुकवून त्याने पलायन केले होते.

तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर परभणीत त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मेहबूब पठाणवर हत्या आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्हय़ांची नोंद आहे.

Related posts: