|Tuesday, May 30, 2017
You are here: Home » क्रिडा » ज्युनियर सुपरमॅन!ज्युनियर सुपरमॅन! 

batball

‘कोहली ऐसे खेल रहा था, जैसे इसका ब्रेकअप ऑस्ट्रेलियावालोंनेही करवाया हो’!

‘ऑस्ट्रेलिया को पता नही है की, हम इंडियावाले चाहे कितना भी टार्गेट हो, मार्च मे पुरा करही देते है! सही है ना’?

‘आत्ता या ऑस्ट्रेलियाला कसं कळत नाही…..आम्ही गावातल्या एखाद्या पोरीची सुपारी फुटली तरी शेवटपर्यंत आशा सोडत नाही…..आन् हा तर वर्ल्ड कप आहे राव’!!!

‘आकाशात उडतो पक्षांचा थवा, क्रिकेटच्या मैदानात फक्त विराटभाऊचीच हवा’!

‘मॅच पाहण्यास न आल्याद्दल अनुष्काला सर्वोच्च पुरस्कार’!

‘युवा पिढी को विराट का विराट संदेश…..गर्लप्रेंड से ब्रेकअप के बाद गुस्सा शराब के ठेके पर नही, अपने कर्मक्षेत्र मे दिखाना चाहिए’!

‘आपण भारतीय ‘कॉर्टर फायनल’ कधीच हारत नाही…..कारण, एकदा कॉटर घेऊन बसलो की ‘फायनल’ करुनच उठतो’!

‘धोनी 14 व्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर विराट म्हणतो, ‘धोनीभाई बहोत रन बनाने है….’ अन् त्याला धोनी उत्तर देतो, ‘सारे रन तो तुझे बनाने है, मै तो सिर्फ विनिंग शॉट के लिए आया हूँ’!

‘युवराज जाते हुए धोनी को बता गया, कोहली के कान मे बार बार अनुष्का कहते रहना’!

‘आता ही अफवा कोणी पसरवली की, धोनीला मॅच संपवायचं वरदान मिळालंय’!

‘आफ्रिदी स्टीव्हन स्मिथला म्हणाला म्हणे, हे भारतीय नेहमी असेच करतात. आपल्याला जिंकायची आशा दाखवतात आणि शेवटी आपण स्वतःच जिंकतात’!

‘डॅरेन सॅमीचा धोनीला फोन, आम्ही गेलला घेत नाही, तुम्ही विराटला घेऊ नका’!

ज्युनियर सुपरमॅन विराटने भारताला जणू एकहाती सामना जिंकून दिला आणि व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या सोशल साईट्सवर अक्षरशः धमाल उडाली. (भारतात किती प्रचंड गुणवत्ता अगदी ठासून आणि ठासून भरली आहे, हे आता कदाचित अशा सोशल साईट्सवरच अधिक दिसून येतं!)

विराटभाऊची बॅट एकदा तळपायला लागली की, कोणतेही आव्हान पुरे ठरु शकत नाही आणि मग समोरचा प्रतिस्पर्धी कोणीही असो! रविवारचा दिवस विराटमुळेच खऱया अर्थाने सुपरसंडे ठरला! प्रतिस्पर्ध्यांना भुईसपाट करणे म्हणजे काय असते, याची प्रचीती विराटने अलीकडे सातत्याने आणून दिली आहे. खरं तर त्याच्या फलंदाजीत जादू आहे. तो फारसा रिव्हर्स स्वीप मारत नाही, किंवा फारसा स्विच हिट तर अजिबात मारत नाही. पण, तरीही ज्याप्रमाणे पायावर येणारे चेंडू लीलया फ्लिक करण्यावर त्याची हुकूमत, त्याचप्रमाणे सरळ बॅटने मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यावर त्याची प्रचंड हुकूमत!

सचिननंतर कव्हरड्राईव्ह मारावा तो विराटनेच! वास्तविक, ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर 4 षटकातच बिनबाद 53 धावा फलकावर लागल्या, त्याचवेळी तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनात धस्स झाले होते. ऑस्ट्रेलिया 200 धावांचा टप्पाही सहज सर करणार की काय, अशीही शंकेची पाल चुकचुकून गेली होती. अश्विन-बुमराहच्या पहिल्या षटकाची अक्षरशः शकले निघाली होती. पण, ज्या नेहरावर ‘याला आता टी-20 संघात कशाला घेतले’, अशी टीका झाली, त्याच नेहराने ख्वाजाची विकेट काढल्यानंतर भारताला या सामन्यात खऱया अर्थाने परतता आले.

पुढे 161 धावांचा पाठलाग करताना रोहित-धवन-रैना असे परतले की, सामना जिंकून देण्याची सारी जबाबदारी विराट आणि धोनीचीच असावी आणि हे तिघे केवळ ‘भूमिपूजन’ करण्यासाठीच मैदानात येत असावेत. पण, विराटमधील एक अंगभूत गुणवत्ता अतिशय वाखाणण्याजोगी आहे, त्याचा खेळ बऱयाच अंशी धावांचा पाठलाग करतानाच बहरतो. त्याला ही जबाबदारी ‘बोझ’ वाटत नाही.

काल त्याने 51 चेंडूत नाबाद 82 धावांची आतषबाजी केली, त्यातही थोडे अधिक डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की, त्याने आपले अर्धशतक साजरे केले होते ते 39 चेंडूत. याचाच एक अर्थ असा की, पुढील 12 चेंडूतच त्याने तब्बल 32 धावांची आतषबाजी केली आणि इथेच या लढतीचा निकालही जवळपास निश्चित झाला. विराट बहरात असताना धोनीने त्याच्याकडे स्ट्राईक अधिक दिली, आणि ते साहजिकही होते.

असे म्हणतात की विश्वचषक विजयाचा मार्ग मोहालीमधूनच जातो. (2011 वनडे विश्वचषकात असेच झाले होते. भारताने त्यावेळी इथेच झालेल्या उपांत्य लढतीत पाकिस्तानचा धुव्वा उडवला आणि नंतर पुढे जाऊन विश्वचषक जिंकला होता). आताही सुरुवात झकास झालीय. (आणि आपल्या सुदैवाने उपांत्य फेरीत विंडीजसारखा असा संघ आहे, ज्याला शेवटच्या सुपरटेन सामन्यात चक्क अफगाणिस्ताने लोळवलेय!) एक बाब मान्य की, टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याच प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये. पण, सध्याचा दोन्ही संघांचा फॉर्म, उभयतांतील सातत्य, मजबुती, कच्चे दुवे यांची सारासार मांडामांड केली तर ते पाहून विंडीजने मनोमन आपला पराभव गृहितच धरला असेल तर त्यातही आश्चर्याचे कारण असू नये!

काल सामना झाल्यानंतर पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या गेटवरच एक सरदारजी भेटले. विराटचे कौतुक करताना क्षणभरही उसंत घेता घेत नव्हते. जाता जाता एक वाक्य अगदी छान बोलून गेले, ‘जो विराट बोले, सो निहाल’!

विराट त्यावेळी भक्कम तटबंदीसारखा केवळ उभाच राहिला नव्हता तर त्याने प्रतिस्पर्ध्यांचे भुईकोट किल्ले कसे जमीनदोस्त होत राहतील, त्यांना कसा सुरुंग लावता येईल, याची प्रत्येक वळणावळणावर कटाक्षाने काळजी घेतली होती आणि म्हणूनच विराटच खऱया अर्थाने विजयाचा शिल्पकार ठरला

आणि हो….त्या अनुष्का शर्माचेही धन्यवाद! सारा देश तुझ्या त्यागाला विसरु शकणार नाही. आमचं पोरगं सुधारलं!

 

Related posts: