|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » क्रिडा » न्यूझीलंडची भारतावर 3-2 ने मातन्यूझीलंडची भारतावर 3-2 ने मात 

rupinder-pal-singh-12

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

येथे सुरु असलेल्या निमंत्रिताच्या चौरंगी हॉकी स्पर्धेत न्यूझीलंडने भारताला 3-2 असे पराभूत केले. या पराभवासह भारताच्या जेतेपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. आता तिसऱया स्थानासाठी भारताची लढत मलेशियाविरुद्ध आज होईल. भारताकडून रुपिंदरपाल सिंगने दोन गोल नोंदवले.

प्रारंभी, सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने दुसऱया लढतीत मलेशियाला पराभूत केले होते. या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे होते. पण, शनिवारी न्यूझीलंडने भारताचा 3-2 असा निसटता पराभव करत जेतेपदाच्या आशा संपुष्टात आणल्या.

भारताने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. 18 व्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला 1-0 असे आघाडीवर नेले. यानंतर न्यूझीलंडला बरोबरी साधण्याची नामी संधी होती, पण गोलरक्षक आकाश चिकटेने निक रोसचा फटका परतवून लावताना ही संधी निष्प्रभ ठरवली. दुसऱया सत्रात भारताने 1-0 अशी आघाडी टिकवून ठेवली होती. तिसऱया सत्रात मात्र न्यूझीलंडने जोरदार आक्रमण करताना दोन गोल केले. निक रोसने 47 व्या तर जेकब स्मिथने 48 व्या मिनिटाला गोल नोंदवला. यानंतर 57 व्या मिनिटाला हुन इग्निलोसने शानदार गोल करत न्यूझीलंडची आघाडी 3-1 ने वाढवली. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी असताना रुपिंदरने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आघाडी 3-2 अशी कमी केली. अखेरीस किवीजने 3-2 अशी आघाडी कायम ठेवताना न्यूझीलंडने हा सामना जिंकला. 27 रेजी तिसऱया स्थानासाठी भारताची लढत मलेशियाविरुद्ध होईल.

Related posts: