|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चिपी विमानतळ धावपट्टी ‘फोर-सी’ पद्धतीने विकसित!

चिपी विमानतळ धावपट्टी ‘फोर-सी’ पद्धतीने विकसित! 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासात महत्वपूर्ण ठरणारे चिपी विमानतळाची धावपट्टी  फोर डी ऐवजी फोर सी पद्धतीनेच विकसीत केली जात असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आमदार नीतेश राणे यांना पत्राद्वारे दिली आहे. अधिवेशनात औचित्याच्या मुद्दय़ावर श्री. राणे यांनी चिपी विमानतळाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिले.

देसाई यांनी म्हटले आहे, मोपा हे मोठे विमानतळ विकसीत होत असल्याने चिपी विमानतळाचा पुनर्भ्यास व आर्थिक क्षमतेचा विचार करून या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी कमी केली आहे. फोर डी ऐवजी सी पद्धतीने विमानतळ विकसीत करण्याबाबत नागरी विमान उड्डाण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या सुकाणू समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार आय. आर. बी. सिंधुदुर्ग विमानतळ प्रा. लि. कंपनीला विमानतळाची धावपट्टी फोर डी ऐवजी फोर सी पद्धतीने विकसीत करण्याचा आराखडा बदल सुचविण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ व आय. आर. बी. सिंधुदुर्ग यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार प्रथम फोर सी पद्धतीने विमानतळ विकसीत केले जाईल. पुढील विस्तार भविष्यातील व्यवसायावर अवलंबून राहील, असेही पत्रात नमूद केले आहे. या नियोजीत चिपी विमानतळावर सर्वसाधारण बी 737, ए 320, एटीआर 72, एटीआर 42 अशा प्रकारची विमाने उतरण्याची क्षमता असेल, असेही पत्रात नमूद केले आहे.

Related posts: