|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीच्या ‘आरडीएक्स’चा धमाका!

सावंतवाडीच्या ‘आरडीएक्स’चा धमाका! 

देवगड : दिलखेचक अदाकारी, सुरेल गायकी आणि नृत्यांसह लावणीचा तडका असलेल्या सावंतवाडी येथील एम. जे. डान्स ऍकॅडमी प्रस्तुत आरडीएक्स क्रो. ग्रुपने देवगडमधील रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर देवगड मिलिंद सदानंद पवार प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळा डोळय़ांचे पारणे फेडणारा ठरला. टाळय़ांचा कडकडाट, शिट्टय़ांच्या प्रतिसादाने प्रेक्षकांनी या लहान विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या ‘जल्लोष महोत्सवा’चा पहिला दिवस रसिक प्रेक्षकांसाठी रंगतदार ठरला. या महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी देवगड बीचवर मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे देवगडमधील ‘इंद्रधनू प्रेस क्लब’ या संस्थेने नियोजन केले. या स्पर्धेला 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच बीचवर वाळूशिल्पेही साकारण्यात आली होती. देवगडमधील अनेक कलाकारांनी तयार केलेली वाळू शिल्पे महोत्सवासाठी येणाऱया पर्यटकांचे आकर्षण ठरली. सायंकाळी सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. देवगडमधील स्थानिक कलाकारांनी सादर केलेली नृत्ये, गाण्यांना रसिकांनी टाळय़ांची उत्स्फूर्त दाद दिली. देवगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हॉरर नृत्यालाही रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सावंतवाडी येथील एम. जे. डान्स ऍकॅडमी प्रस्तुत आरडीएक्स क्रो. ने देवगड महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या कार्यक्रमात रसिकांची मने जिंकली. मराठी लावण्या, हिंदी, मराठी व इंग्रजी नृत्यांवर उपस्थित रसिकांना ठेका धरायला लावला. मिमिक्री, टॅकवरील गाणी, शेरोशायरी याला रसिकांनी टाळय़ांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

Related posts: