|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मोकाट जनावरे पोहोचली न. पं. कार्यालयात

मोकाट जनावरे पोहोचली न. पं. कार्यालयात 

कणकवली : शहरातील मोकाट जनावरांवरील कारवाईकडे गेले कित्येक महिने नगर पंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे. शनिवारी चक्क मोकाट वासरू थेट नगर पंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारातून थेट कार्यालयातच गेले. कर्मचाऱयांनी धावपळ करीत वासराला बाहेर काढले. या घटनेमुळे मोकाट जनावरांनीच सत्ताधाऱयांचे लक्ष वेधल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती.

मोकाट जनावरांना बंदिस्त करण्यासाठी न. पं. च्यावतीने निधी खर्चून गोपुरी आश्रमात कोंडवाडा उभारण्यात आला. याबाबत करारनामा देखील झाला. माजी नगराध्यक्ष ऍड. प्रज्ञा खोत यांच्या काळात काही काळ मोकाट जनावरे पकड मोहीम राबविल्यावर मोकाट जनावरे पकडणे व त्यांची निगा राखणे यावर मोठा खर्च येऊ लागला. त्यानंतर ही मोहीम थांबविण्यातच आली आहे. शनिवारी दुपारी तर मोकाट वासराने थेट न. पं. कार्यालयात हजेरी लावल्याने एकच गोंधळ उडाला. आतातरी न. पं. च्या सत्ताधारी व प्रशासनाला या प्रश्नी जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related posts: