|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » हवाईदल प्रमुखपदी धनोआ विराजमान

हवाईदल प्रमुखपदी धनोआ विराजमान 

नवी दिल्ली :

देशाच्या हवाईदल प्रमुखपदी शनिवारी एअर मार्शल विरेंद्र सिंह धनोआ विराजमान झाले. मावळते हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुण राहा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. या सोहळय़ापूर्वी राहा यांना हवाई दलाच्यावतीने ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना देण्यात आली.

हवाईदल प्रमुखपदी नियुक्त झालेले एअर मार्शल विरेंद्र सिंग धनोआ हे 1 जून 2015 पासून उप हवाईदल प्रमुखपदी कार्यरत होते. त्यांचा हवाई दलातील अनुभव मोठा आहे. 1999 च्या कारगील युद्धामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. हवाई दलातील विशेष योगदानाबद्दल त्यांना युद्ध सेवा मेडल, वायू सेना मेडलने गौरवित करण्यात आले आहे.