|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » महाराष्ट्रात निर्भय मुली घडविणार

महाराष्ट्रात निर्भय मुली घडविणार 

जाणीव’ या सामाजिक संस्थेच्या आरती वाढेर यांचा निर्धार

पूनम अपराज/ मुंबई

6 ऑगस्ट 2015 साली संस्थापक मिलिंद पोंक्षे यांनी ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेचा पाया रचला. 12 ते 18 वयोगटातील मुलींना भय, स्पर्श, विचार, संस्कार, प्रलोभन, व्यसन, आकर्षण आणि प्रभाव या विषयांवर ही संस्था विनामूल्य व्याख्याने देते. राज्यात आतापर्यंत 170 शाळा तसेच महिला मंडळामध्ये जाणीवतर्फे व्याख्याने देण्यात आली. सगळी व्याख्याने समाजहित लक्षात घेऊन विनामूल्य दिली आहेत. हा आत्मनिर्भरतेच्या जाणिवेचा वसा घेऊन मिलींद पोंक्षे, स्वाती जोशी, आशिष धुरी आणि आरती वाढेर यांच्या सहकार्याने 2015 ते 2016 या कालावधीत 50 हजार मुलींपर्यंत हे व्याख्यान पोहोचवण्याचा निर्धार पूर्ण केला आहे. 2017 या नव्या वर्षात संपूर्ण राज्यात दौरा काढून प्रत्येक मुलीला निडर करून एक दिवस असा उजाडला पाहिजे की अशा व्याख्यानाची गरज लागणार नाही, असे आरतीने सांगितले.

या संस्थेची 24 तास सुरू असलेली हेल्पलाईन 7666629566 या क्रमांकावर देखील अनेक फोन कॉल्स प्राप्त होत असून मुलींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षणाच्या वारीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर आणि पुणे येथे आमची व्याख्याने आयोजित केली होती. आता जानेवारी महिन्यात औरंगाबाद येथे व्याख्यान आयोजित केले आहे. हीच नव्या वर्षाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल, असे आरती
म्हणाली.

 विरार येथे ‘जाणीव’ संस्थेचे मिलिंद पोंक्षे यांनी सुरक्षिततेचे भयचक्र भेदण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या समाजात अनेक पुरोगामी बदल घडून आले तरी दुर्दैवाने स्त्राr म्हणजे उपभोग वस्तू यादृष्टीने पाहणाऱयाची संख्या आजही लक्षणीय आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणांहून जाणाऱया मुलींची छेडछाड, जाणूनबुजून स्पर्श करणे, बलात्कार, पाठलाग करणे अशा अनेक घफणास्पद घटना वारंवार उजेडात येत असतात. अशा गोष्टींचा अनुभव कोवळय़ा वयातच येत असल्याने शालेय विद्यार्थिनींमध्ये असुरक्षिततेचे भयचक्र निर्माण होते. त्यातून येणारे न्यूनगंड आणि भीती अनेक मुलींच्या व्यावसायिक तसेच कौटुंबिक जीवनावर परिणाम घडवतात. हेच भयचक्र भेदण्यासाठी विरारमधील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी कसोशीने प्रयत्न करीत आहे. ‘जाणीव’ या विषयावर शालेय विद्यार्थिनींना व्याख्याने देऊन चांगले आणि वाईट कसे ओळखायचे प्रशिक्षणच आरती वाढेर देत आहे.

कोवळय़ा वयातील मुलींनी कसे वागावे, समाजात कसे सुरक्षित रहावे, विचार, संस्कार, भय, स्पर्श, प्रलोभन, वर्तणूक या विषयावर मुलींचे आत्मभान जागफत करत त्यांना स्वत:ची ओळख करून देण्यासाठी आरती एक तासाचे तर संस्थापक मिलिंद पोंक्षे अर्धा तास प्रबोधनपर व्याख्यान देतात. समवयस्क मुलगी व्याख्यान देत असल्यामुळे मुलींचा उस्फूर्त प्रतिसाद या व्याख्यानाला मिळतो. स्वत:ला ओळखा, सावध रहा, पुढे चला हा संदेश मुलींना देत असतानाच स्वत:चा बचाव कसा करायचा हेही या व्याख्यानात सांगितले जाते. जेव्हा या संस्थेने सर्वेक्षण
केले असता असे लक्षात आले की, मुलींना हाताळणारे बाहेरचे कोणी
नसून नातेवाईक, मित्र परिवार किंवा ओळखीची व्यक्तीच लहान मुलांना हाताळत असते.

Related posts: