|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » राहुल गांधीकडून नववर्षाचे स्वागत विदेशात

राहुल गांधीकडून नववर्षाचे स्वागत विदेशात 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी विदेशात रवाना झाले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीसही ते देशाबाहेर आहेत. खासगी यात्रेसाठी लंडनमध्ये जात असल्याचे सांगण्यात आले. राहुल यांनी ट्विट करत आपण विदेशात जात असल्याचे सांगितले. मात्र कोणत्या देशात जात असल्याचे त्यांनी सांगितले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बुधवारी लंडनला गेले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत ते त्याठिकाणीच करणार आहेत. यावेळी ट्विटमध्ये त्यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी हे अगोदरच विदेशात गेले होते. यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास काँग्रेस पक्षाकडून नकार देण्यात आला. मात्र शनिवारी राहुल यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आपण विदेशात गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.