|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » क्रिडा » मो फराह, अँडी मरेचा सन्मान

मो फराह, अँडी मरेचा सन्मान 

वृत्तसंस्था/ लंडन

ऍथलिट मो फराह व टेनिसपटू अँडी मरे यांना नव्या वर्षातील पुरस्कारांच्या यादीत नाईटहूड किताबाने गौरवले जाणार असल्याची घोषणा शनिवारी केली गेली. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी फराह व मरे यांच्या नावाची रीतसर घोषणा केली. 29 वर्षीय मरेने यंदा दुसरे विम्बल्डन व पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला तर मो फराहने यंदा रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत 5 हजार व 10 हजार मीटर्सचे जेतेपद कायम राखले. फराह 4 ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला ब्रिटीश ट्रक अँड फिल्ड ऍथलिट आहे. मरेला यापूर्वी 2012 मध्ये ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ हा पुरस्कार प्रदान केला गेला.  ब्रिटिश साम्राज्यात मेंबर, ऑफिसर व कमांडर अशा चढत्या क्रमाने पदवी देण्याची प्रथा रुढ आहे.