|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » इस्लामपूरच्या निवडणूकी नंतर विरोधकांना घबाड मिळाल्याचा भास

इस्लामपूरच्या निवडणूकी नंतर विरोधकांना घबाड मिळाल्याचा भास 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

विरोधकांना इस्लामपूरच्या निवडणूकीने मोठे घबाड हाती लागल्यासारखे झाले असून ते सर्वजण तत्वांना मुरुड घालून एकत्र येत आहेत. मात्र यातच आमचा पहिला विजय आहे., या शब्दात विरोधकांना फटकारत ‘माझा कार्यकर्ते व जनतेवर पूर्ण विश्वास असून पुढून जेंव्हा-जेंव्हा असा प्रयत्न होतो, तेव्हा माझा कार्यकर्ता इर्षेने कामाला लागतो, असे मत माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

  भाटवाडी येथील नळपाणी पूरवठा योजनेच्या जलकुंभाच्या कामाचे भूमीपुजन व ग्रामपंचायतच्या नवीन कार्यालयाच्या उदघाटन समारंभात आ.पाटील बोलत होते. माजी आ.मानसिंगभाऊ नाईक, जि.प.माजी अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष जनार्दन पाटील, पं.स.सभापती रविंद्र बर्डे, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील हे उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, आपल्या गावात पिण्याच्या पाण्याची योजना उभा रहात असून आपणास शुध्द व भरपूर पाणी मिळू शकते. पिण्याच्या पाण्याच्या योजना जोराने सुरु होतात. मात्र नंतर विज बिलांचा मोठा प्रश्न तयार होतो. मात्र देवराज पाटील यांनी सौरऊर्जेवर चालणाऱया 5 एचपी मोटारीची व्यवस्था केल्याने खर्च कमी येवू शकतो. संयुक्त पाणीपूरवठा संस्थेस कासेगाव येथे एअर वॉल काढण्यासाठी दोन शेतकऱयांची संमती हवी असून याकामात लक्ष घालून मार्ग काढू. भैरवनाथ देवालयासमोर भव्य सभा मंडप झाला. मात्र मूळ देवालयासमोर सभा मंडप बांधण्यास मार्ग काढू. गावकऱयांनी सर्वांच्या सहकार्यातून गाभारा बांधावा. शासनाच्या प्रेसमध्ये सर्व नोटा छापल्या. त्या काही तुम्ही कोणी छापलेल्या नाहीत. मग नोटा बॅकांत येण्या ऐवजी काळा धंदेवाल्यांच्याकडे कशा गेल्या? आपल्या हातात दोन हजाराच्या भरपूर नोटा येवोत आणि 1 जानेवारी पासून आपणास रांगेत उभा रहाण्याची वेळ येवू नये. या देशतील 96 नागरिकांना रांगेत उभा राहून आपला जीव गमवावा लागला. मात्र त्याबददल शासनाने ना खेद व्यक्त केला, ना भरपाईबददल चकार शब्द काढला.

देवराज पाटील म्हणाले, मानसिंगभाऊ आमदार होते, आणि साहेब मंत्री होते, तेंव्हा आपणास मागेल, ते मिळत होते. मात्र सध्याच्या आमदारांचे गावाकडे फारसे लक्ष आहे, असे दिसत नाही. उलट ते भाऊ व साहेबांनी मंजूर केलेल्या कामांची उदघाटने करीत आहेत. मध्यतंरी या गावातील युवकांना वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला. आता जि.प.निवडणूकीच्या निमित्ताने काही मंडळी येवून प्रलंबित कामाचे गाजर दाखवितील. मात्र ही मंडळी विधानसभा निवडणूकी नंतर आपल्याकडे फिरकली का? याचा विचार आपण करावा. कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, माजी आमदार मानसिंगभाऊ नाईक यांनी या परिसराच्या विकासाला चालना दिली आहे. त्यांच्या पाठीशी उभा राहूया.

जेष्ठ कार्यकर्ते सुरेश जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक हरिश्चंद्र औताडे यांनी आभार मानले. सलिम शेख यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी युवक राष्ट्रवादीचे तालुध्यक्ष संजय पाटील, मारुती शिंदे, राहूल चव्हाण, माजी पं.स.शामराव पाटील, अभियंता एन.पी.कोरे, सरपंच सतिश डोंगरे, सोसायटीचे अध्यक्ष सुरेश देवकर, अशोक देवकर, उपसरपंच काशिलिंग तिवले, पांडूरंग साबळे, रेखा डंगारणे, संगीता रोकडे, शिल्पा पवार, सुजाता दमे, दादा डंगारणे, दिनकर उथळे, ग्रामसेवक वजारे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.र्ं

Related posts: