|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शौचालये बांधा अन्यथा कारवाईला सामोरे जा : अरूण डोंगरे

शौचालये बांधा अन्यथा कारवाईला सामोरे जा : अरूण डोंगरे 

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर जिल्हा 2018 पर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्व विभागाचे प्रयत्न महत्वाचे आहेत. लोकांच्या विचारात बदल करा. शौचालयाचे काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिला.

सोलापुर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या विस्तार अधिकारी यांची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहीरे, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, यशवंती धत्तुरे आणि शंकर बंडगार आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ स्वतःहून शौचालये बांधायाची आहेत. उत्तर सोलापुर तालुक्यातील सर्व शौचालयाचे फोटो शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करा. दररोज एका तालुक्याने 90 शौचालयाचे बांधावी लागणार आहेत. हलगर्जीपणा करणारेच सेवा पुस्तकात नोंद होणार आहे. स्वच्छ भारत मिशन हे राष्ट्रीय काम आहे. या हलगर्जीपणा करू नका. बांधलेल्या शौचालयाची नोंद घ्या. मुख्यमंत्र्यांनी मार्च 2018 पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. हे सामाजिक काम आहे. शौचालय हे टेंडर काढून करावयाचे काम नाही. बांधकाम विभागास दिल्यास हे काम सहा महिन्यात पूर्ण केले असते. मात्र, हे वर्तनात व मानसिकतेत बदल करण्याचे काम करावे लागणार आहे. बेसलाईन सर्व्हेबाहेरील कुटुंबाचा समावेश रोजगार हमी योजनेत करा, असे आवाहन अरूण डोंगरे यांनी केले. याप्रसंगी शौचालयाची तांत्रिक माहिती देण्यात आली. यासाठी दबडे, मुपुंद आकुडे, अंकुश भगवान, प्रशांत फडतरे यांनी प्रयत्न केले.