|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिराळा नागपंचमी बचाव समितीच्या 22 जनांच्या वरती प्रतिबंधात्मक कारवाई

शिराळा नागपंचमी बचाव समितीच्या 22 जनांच्या वरती प्रतिबंधात्मक कारवाई 

प्रतिनिधी/ शिराळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांना नागपंचमी संदर्भात निवेदन देवू ईच्छीनाऱया व शिराळा बंदचे आवाहन करणाऱया नागपंचमी बचाव समितीच्या 22 कार्यकर्त्यांच्या वरती पोलीसांच्या कडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

शनिवार दिनांक 31 डिसेंबर रोजी शिराळा येथे विविध विकास कामांच्या व शेतकरी मेळाव्याच्या निमीत्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. या दरम्यान मुख्यमंत्र्यांना नागपंचमीच्या संदर्भात निवेदन देण्याचा ठराव नागपंचमी बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता. तसेच शिराळा शहरात बंदचे आवाहनही करण्यात आले होते. परंतू या ठिकाणी कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी या कार्यकर्त्यांना निवेदन देण्याच्या अगोदरच पोलीस ठाण्यात नेले होते. त्या दरम्यान या 22 कार्यकर्त्यांच्या वरती प्रतिबंधात्म कारवाई केली असल्याचे समजत आहे. या 22 कार्यकर्त्यांना शिराळा येथून तासगांव येथे नेण्यात आल्याचेही समजून येत आहे.

 प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या कार्यकर्त्यांची नांवे अशी, भगतसिंग नाईक, विश्वास कदम, प्रमोद नाईक, अरुण साळुंखे, देवेंद्र पाटील, सुनिल कवटेकर, विकास रोकडे, केदार नलवडे, राम जाधव, संतोष हिरुगडे, प्रताप कदम, चंद्रकांत निकम, अभिजीत यादव, सागर नलवडे, अजय जाधव, वसंत कांबळे, वैभव कुंभार, सम्राटसिंह शिंदे, रमेश नांगरे, मोहन जिरंगे, माणिक पाटील यांना ताब्यात घेवून यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.