|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेंद्री येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

शेंद्री येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

शेंदी गावातील विविध विकास कामांसाठी 27 लाखाची निधी मंजूर झाला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. नंदाताई बाभूळकर, गोकुळचे रामराज कुपेकर, बी. एन. पाटील-मुगळीकर, जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, सभापती मिनाताई पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, पंचायत समिती सदस्य अमर चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी राऊत होते.

आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शेंदीच्या विकासासाठी आपले प्रयत्न असून गावातील अंगणवाडी क्र. 272 ला आयएसओ नामांकन मिळाल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीचे काम व विकासकामेही आदर्शवत असल्याचे सांगितले. यावेळी दिपक कुलकर्णी, महाबळेश्वर चौगुले, दिनकर सावंत, संभाजी मोरे, आनंदा तोडकर, महादेव मोरे, मारूती नाईक, सुनिल घेवडे, सुरेश जाधव, संभाजी बाबर, रावसाहेब जाधव, तानाजी पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, दुधसंस्था, सेवासंस्था, महिला बचत गट प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच सदाशिव सावंत यांनी आभार मानले.

Related posts: