|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडली कॅश वाहतूक करणारी गाडी

ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडली कॅश वाहतूक करणारी गाडी 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा-गडहिंग्लज मार्गावर आजरा सूतगिरणीनजीकच्या वळणावर शनिवारी दुपारी ऊसाने भलेली टॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. यावेळी टॅक्टरला ओव्हरटेक करताना आयसीआयसीआय बँकेची कॅश वाहतूक करणारी गाडी टॅक्टर खाली आली. या अपघातात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.

सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास झुलपेवाडी येथून ऊस घेऊन आजरा कारखान्याकडे जाणाऱया टॅक्टर ट्रॉलीची बेरींग तुटल्याने ट्रॉली पलटी होऊन ऊस स्त्यावर उलटला. या ऊसाखाली कॅश वाहतूक करणारी गाडी सापडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या गाडीत बी. ए. गवस, पंकज कांबळे, रवी दळवी, जे. डी. सावंत, राहूल कणसे हे पाचजण होते. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांसह आजरा शहर तसेच परीसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेतली. ट्रॉलीखाली सापडलेल्या गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याचे पाहिल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

दरम्यान रस्त्यावरच या ऊस व टॅक्टर अडकल्याने दोन्ही बाजूला वाहतूकीची मोठी कोंडी झाली. उपस्थितांच्या मदतीने पोलीसांनी रस्त्यावरील ऊस व अपघातग्रस्त ट्राली बाजूला हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.