|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शेतकरी सक्षम झाला तर कर्ज माफिची गरज नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरी सक्षम झाला तर कर्ज माफिची गरज नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

कन्यागतच्या निमित्ताने तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. उर्वरित कामासाठी आणखीन निधी देण्याचे मान्य करून शेतकरी कर्ज बाजारी होऊ नये, शेतकरी सक्षम बनला पा†िहजे, यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात असून शेतकरी सक्षम बनला तर कर्ज मुक्तीची गरजच राहणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शिरोळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पंचायत समिती कार्यालय व मध्यवर्ती प्रशासकीय इमारात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील सरकारने शेतकऱयांची कर्ज माफी केली. मात्र पुढील वर्षी पुन्हा ते शेतकरी कर्ज बाजारी झाले. या कर्ज माफीचा फायदा घोटाळेबाजांना झाला. हा काळा इतिहास पुसण्यासाठी आम्ही नवा इतिहास निर्माण करत शेतकऱयांच्या हितासाठी जलयुक्त शिवार, सिंचन योजना, शेततळे आदी कोटय़ावधी रूपयांच्या योजना राबवून शेतकऱयांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदाका शेतकरी सक्षम झाला की, त्याला कर्ज माफिची गरज भासणार नाही. आमचे सरकार हे शेतकऱयांचे हित जपणारे आहे. गेलेल्या जमिनी शेतकऱयांना परत मिळवून दिल्या आहेत. शेतकऱयांनी एकत्रित गट निर्माण केल्यास सामुदायिक ऊस शेतीसाठी ऊस तोडणी यंत्र देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.

दुग्ध व्यवसायाबद्दल बोलताना ते म्हणाले, खासदार राजू शेट्टी दुध उत्पादकांना चांगला दर देतात, तर इतर दुध संघ का चांगला दर देवू शकत नाहीत, कारण ते नेते आहेत. शेतकऱयांचे कौवारीच दुध संघ चांगला चालवू शकतो, हे खासदार शेट्टी यांनी दाखवून दिले आहे. शेतकऱयांना व ग्राहकाला बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सावंता माळी बाजार योजना सुरू केल्याने शेतकऱयांच्या मालाला चांगला भाव मिळाला. शिवाय ग्राहकांनाही योग्य दरात भाजीपाला उपलब्ध झाला.

प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत खासदार राजू शेट्टी यांनी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा गौरव करत शेतकऱयांच्या हितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे कौतुक केले. ग्राहक व उत्पादक यांच्यामध्ये चांगला मेळ घालण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. दुधाची ऑनलाईन विक्री व्हावी त्याचबरोबर उत्पादीत भाजीपाला देशाच्या कानाकोपऱयात पोहोचविण्यासाठी  रेल्वे खात्याकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी कुनाल खेमणार, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सिमा पाटील, शिरोळ पंचायत समिती सभापती सुवर्णा अपराज, तहसिलदार किरणकुमार काकडे, उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, जयसिंगपूर भाजपा मंडल अध्यक्ष मिलिंद †िभडे सागर संभुशेटे, धैर्यशील देसाई, महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल पुजारी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.