|Thursday, November 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पुनर्वसीत गावांच्या सुविधांसाठी निधी मंजूर

पुनर्वसीत गावांच्या सुविधांसाठी निधी मंजूर 

प्रतिनिधी/ सातारा

कोयना प्रकल्प टप्पा क्र. 1 व 2 अंतर्गत जावली तालुक्यातील पुनर्वसीत गावठाणांमध्ये नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता. याला यश मिळाले असून आमदार शिवेंद्रराजे यांच्या प्रयत्नातून जावली तालुक्यातील पुनर्वसीत गावांसाठी एकूण 28 नागरी सुविधांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी महसूल व वनविभागाकडून 3 कोटी 24 लाख 16 हजार 995 रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.   

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जावलीतील कोयना               प्रकल्पांतर्गत पुनर्वसीत गावांना नागरी सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करुन या गावांना नागरी सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात आमदार शिवेंद्रराजे यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत सर्व विभागाकडेही याबाबत पाठपुरावा केला. तालुक्यातील पुनर्वसीत गावांमध्ये 28 नागरी सुविधांना मंजूरी मिळवून त्यासाठी 3 कोटी 24 लाख 16 हजार 995 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

जावळीच्या विकासाला चालना मिळणार असून पुनर्वसीत गावांच्या नागरी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध झाल्याने जावली तालुक्यातील या गावांच्या विकासाला चालना मिळाली आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रीया तातडीने पुर्ण करुन प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी आणि सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी तत्पर रहावे, अशी सुचना आमदार शिवेंद्रराजे यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱयांना केली आहे.

शेंबडी, फळणी, कळकोशी, वाकी, मुनावळे, शेंबडी खुर्द कारगाव, अंबवडे (कारगाव) वाकी, नवलाईवाडी, शिवाजीवाडी तानाजीवाडी आदी पुर्नवसित गावांच्या  मुलभूत सुविधा तसेच अंतर्गत रस्ते,  संरक्षक भिंत जोड रस्ते, ग्रामपंचायत इमारत आदी कामांना मंजूर देण्यात आली आहे. या कामांना निधीही मिळाला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याने या गावातील ग्रामस्थांमधून समाधन व्यक्त होत आहे. याबद्दल ग्रामस्थ शिवेंद्रराजे यांना धन्यवाद देत आहेत.

Related posts: