|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सरत्याला निरोप, नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत

सरत्याला निरोप, नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत 

प्रतिनिधी/ सातारा

सरते वर्ष 2016 ला निरोप देत नवीन वर्ष 2016 चे सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आले.जिह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी 31 डिसेंबरची धूम दिसत होती.बहुतेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत सरत्या वर्षाचे साजरीकरण सुरु होते.या पाटर्य़ांची रंगत बोचऱया थंडीत वाढत चालली होती. दरम्यान, सकाळपासूनच चिकन, मटनच्या दुकानावर ओसाडून गर्दी वाहत होती. एकटय़ा सातारा शहरात हजारो किलो मटनाचा फडशा पडला.

मद्यधूंद पाटर्य़ांमध्ये संगीताच्या तालावर तरुणाईनेही ठेका धरला होता.साजरीकरणामध्ये होणाऱया हुल्लडबाजीवर रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर होती.शहराबाहेर जाणाऱया रस्त्यावर पोलिसांची तपासणी सुरु होती.अनेक दुचाकीधारकांवर पोलिसांनी कारवाई केली.आऊटडोअर पाटर्य़ाही सुरु होत्या.सातारा शहर व उपनगरामध्ये हॉटेल्स, ढाबे व चायनिजचे गाडय़ावर खव्वयांनी गर्दी केली होती.काही हॉटेल्सवर मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत संगीतांच्या मैफिली सुरु होत्या.ऍपार्टमेंटच्या टेरेसवरही पाटर्य़ा सुरु होत्या.तर ग्रामीण भागात प्राथमिक शाळांची मैदाने, गावालगतची पडक्या इमारतीत पाटर्य़ा सुरु होत्या.अजिंक्यतारा,चारभिंती,बोगदा, यवतेश्वर परिसरात पेट्री, कास पठार, बामणोली, ठोसेघर, उरमोडी, कण्हेर धरण परिसरातील तरुणाई पाटर्य़ांमध्ये संगीताच्या तालावर सैराट होवून झिंगाट झाली होती.

मावळय़ांचा जागता पाहरा तर पोलिस जवानही ऑन डय़ुटी

गडकोटांच्या परिसरात मद्यधूंद पाटर्य़ा होवू नयेत म्हणून म्हणून येथील धर्मवीर युवा मंचच्या मावळय़ांनी जागता पाहराच ठेवला होता.वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश घाडगे, सातारा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र पिसाळ यांनी सर्व कर्मचाऱयांना ऑन डय़ुटी राहण्याची सुचना केली होती. ते स्वतःही गस्तीवर फिरत होते. कोठेही उपद्रवी घटना घडू नये यासाठी डोळय़ात तेल घालून फिरत होते.

Related posts: