|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य’ ग्रुप

जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य’ ग्रुप 

प्रतिनिधी/ सातारा

येथे गेल्या 11 वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीरे, पर्यावरण व निसर्गरक्षण, प्लास्टीक मुक्ती,  स्त्राr सबलीकरण, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. समाजसेवा हाच कर्तव्य सोशल ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश असून एक सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रुपचे कार्य अखंडपणे सुरु राहणार आहे. विविध प्रकारच्या आरोग्य शिबीरांना रुग्णांचा मिळणारा उत्स्फुर्त सहभाग हीच कर्तव्य सोशल ग्रुपच्या कार्याची पोचपावती आहे, असे प्रतिपादन कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका  वेदांतिकाराजे भोसले यांनी केले. 

कारी (ता. सातारा) येथे स्व. आ. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ कर्तव्य सोशल ग्रुप आणि कारी ग्रामस्थ यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित मोफत नेत्रतपासणी व मातीबिंदू शत्रक्रीया शिबीराप्रसंगी वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य राजू भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, गजानन मोरे, ब्रम्हदास मोरे, रामदास मोरे, शोभा मोरे, शिवाजी मोरे, आनंदा किर्दत, आनंदा बैले, साहेबराव अडागळे, मारुती मोरे, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांची प्रमुख उपस्थिती होती.  

यावेळी बोलताना वेदांतिकाराजे म्हणाल्या, आरोग्य शिबीर अथवा पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग हीच ग्रुपची प्रेरणा ठरली आहे. जनसामान्यांची सेवा करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप अविरतपणे कार्यरत राहणार असून कर्तव्यच्या प्रत्येक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून सहकार्य केल्याबद्दल वेदांतिकाराजे यांनी नागरिकांना धन्यवाद दिले. 

यावेळी विजय देशमुख, दीपक भोसले, संदीप भणगे, विलास कासार, डी.पी. शेख, महेश यादव, पदमसिंह फडतरे, सतीश जाधव, चंदन घोडके यांच्यासह कर्तव्य सोशल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.