|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नागठाणे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात

नागठाणे महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात 

प्रतिनिधी/ नागठाणे

नागठाणे येथील आर्टस ऍन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये ’मानवी हक्क’ या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. उदघाटक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, ऍड. असीम सरोद. प्रमुख मार्गदर्शक माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, डॉ. शितल बाबर होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष  प्राचार्य सुहास साळुंखे होते.

सरोदे म्हणाले की, मानवी हक्क म्हणजे चांगले प्रशासन, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंञ्य आहे. राजकीय स्वार्थापोटी केलेले राजकारण लोकशाहीस व मानवी हक्कासाठी घातक आहे.

 कोळसे पाटील म्हणाले, म. फुलेंनी मानवी हक्क हा सामाजिक आर्थिक विषमतेविरूध्द लढा दिला आहे. चुकीच्या व्यवस्थेविरूध्द लढा देणे ही आज काळाची गरज आहे.

साळुंखे म्हणाले, गांधीजींनी आपल्या विचारातून एक समृध्द पिढी घडविण्याचे काम केले आहे. देश हितासाठी स्वत: मध्ये बदल आवश्यक त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे. बाबर म्हणाल्या, जाताभेद आपल्या देशाला लागलेली किड आहे. ती संपवली पाहिजे. सुहास साळुंखे म्हणाले, विचार  बदलण्याची गरज आहे म्हणजे तेंव्हाच देश  बदलेलं.  देश हितासाठी जगलं पाहिजे.

प्रास्ताविक प्राचार्य अशोक करांडे यांनी, पाहुण्यांचा परिचय डॉ. सुभाष शेळके, आभार प्रा. व्ही. बी. कुलकर्णी तर प्रा. अमोल सोनवले सूत्रसंचालन केले आहे. यावेळी प्रा. कैलास पाटील प्राचार्य आनंद मेणसे, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील महाविद्यालयातून प्राध्यापक व सातारा, कराड व कोरेगाव येथील बार कौन्सिलचे वकील, नागठाणे गावचे ग्रामस्थ, पत्रकार व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.