|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात हाय अलर्ट

गोव्यात हाय अलर्ट 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील किनारी भागात आतंववादी हल्ला होण्याची शक्यात असल्याने पोलासंनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किनारी भागात विविधठिकाणी पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. याची संधी साधून किनारी भागात आतंकवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती केंद्रीय गुप्तहेर खात्याकडून गोवा पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुशंगाने जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आल्याचे पोलिसंनी सांगितले.

   हणजूणा, बागा, कांदोळी, कळंगुट, आणि मोरजी या भागात मोठय़ाप्रणात पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. या भागात कडकबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणतीही धोकादायक घटना घडणार नाही याचीदक्षता गोवा पोलीस खात्याने घेतली आहे असे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले. गोव्यात होणाऱया कुठल्याही कार्यक्रमांसाठी गोवा पोलीस तैनात असतातच. नव्या वर्षाच्या पुर्वसंध्येला होणाऱयाकार्यक्रमांसाठी पोलीसांनी खास व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले. सशस्त्र पोलीस तसेच इतर पोलीस मिळून सुमारे 600 पोलीस गोवा किनारी भागात तैनात करण्यात आले आहेत. असेही पोलीस अधकारी म्हणाले. रविवार पर्यंत हे पर्यंत हे पोलीस डय़ुटीबजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.