|Monday, July 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘लाख मराठा’ ताकदीचे दर्शन घडवा

‘लाख मराठा’ ताकदीचे दर्शन घडवा 

एकजुटीसाठी माघार आवश्यकच; मतदारांना नव्या नेतृत्वाची आस

प्रतिनिधी/ बेळगाव

‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणेतून मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करण्यात बेळगाव तालुक्मयातील मराठी शेतकऱयांचे योगदान मोठे आहे. सध्या एपीएमसी निवडणुकीच्या रिंगणात बहुसंख्येने उतरलेल्या उमेदवारांना या मराठी मतदारांची एकजुटीची हाक ऐकू येणार का? हा प्रश्न मतदार बळीराजा विचारतो आहे. मराठी बळीराजाने एपीएमसीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुनःश्च एकवार एल्गार पुकारणे गरजेचे बनले आहे.

एपीएमसी निवडणुकीसाठी माघार घेण्याकरिता सोमवारचा अखेरचा दिवस उपलब्ध आहे. प्रत्येक मतदार संघातून बहुरंगी लढतीचे चित्र सध्या दिसते आहे. त्यामध्येही मराठी भाषिक उमेदवारांची संख्या अधिक आहे. राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी मराठी भाषिकांना वेठीस धरून उमेदवारीचे गाजर दाखविले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मराठी विरुद्ध मराठी अशा लढती होण्याची चिन्हे दिसत आहेत. अशावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून एकजुट व्हावी आणि मराठी भाषिकांचे वर्चस्व प्रस्थापित व्हावे, यासाठी प्रयत्नांची गरज आहे. परंतु अशा प्रयत्नांना खीळ घालण्याचे कारस्थान काही महाभाग करीत आहेत. केवळ पैशाच्या जोरावर राजकारण करणारे काही महाभाग यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे मराठी सत्तेला ग्रहण लागण्याचा धोका आहे. यासाठी वेळीच जागरुक होणे गरजेचे बनले आहे.

मतदारांना आता नव्या नेतृत्वाची आस

यापूर्वी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीच्या वेळी बसलेला दुफळीचा फटका मराठी मतदार विसरलेला नाही. मराठी मतदारात फूट पाडून स्वतःचा हेकेखोरपणा पुढे रेटणाऱया नेतृत्वाचा आता मतदारांना वीट आला आहे. त्यामुळे नव्या नेतृत्वाची आस मतदारांना लागली आहे. नेहमी आपणच अशा थाटात वावरणाऱया या मंडळींनी यापूर्वी केलेली कारस्थाने लक्षात घेऊन मतदारांनी आता जागरुक व्हावे आणि एकजुटीसाठी आग्रह धरून एपीएमसीवर मराठीचा झेंडा फडकवावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

महाभागांना त्यांची जागा दाखवा

बेळगाव तालुक्मयात बहुसंख्येने असणाऱया मराठी भाषिक शेतकऱयांचे वर्चस्व एपीएमसीवर राखणे गरजेचे आहे. याच शेतकऱयांच्या मतावर निवडून येऊन त्यानंतर त्यांची दिशाभूल करणाऱया आणि पदे भोगून मराठी मतदारांना विसरणाऱया महाभागांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया मतदारांतून व्यक्त होत आहे.

एकच उमेदवार द्या

एपीएमसी निवडणुकीतून माघार घेण्याच्या दृष्टीने काही उमेदवारांनी स्वतः तयारी दर्शविली आहे. तसेच ठिकठिकाणी यासाठी बैठका होऊ लागल्या आहेत. मात्र केवळ व्यक्तीद्वेषाने ग्रासलेल्या काही नेत्यांनी यासाठी खो घालण्याचा प्रयत्न चालविला आहे. यामधून सुज्ञ मतदारांनी बोध घेऊन एकच उमेदवार देण्याच्या दृष्टीने रेटा लावणे गरजेचे बनले आहे. 

Related posts: