|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एपीएमसी निवडणुकीतील तिघांची माघार

एपीएमसी निवडणुकीतील तिघांची माघार 

प्रतिनिधी/ बेळगाव

एपीएमसी निवडणुकीतून जिह्यात तिघांनी माघार घेतली आहे. यामध्ये काकती मतदार संघातून आणि व्यापारी मतदार क्षेत्रातून दोघांनी माघार घेतली आहे. आता सोमवारी आणखी काही जण माघार घेणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शेतीमाल प्रक्रिया आणि कृषीमाल विक्री संघातून केवळ दोनच अर्ज आल्यामुळे ते दोघेही बिनविरोध होण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली आहे.

एपीएमसी निवडणुकीच्या अर्जांची छानणी शुक्रवारी पार पडली. यामध्ये 720 अर्ज वैध ठरले होते. सात उमेदवारांचे अर्ज अवैध झाले होते. त्यानंतर शनिवारी तिघांनी माघार घेतली आहे. काकती मतदारसंघातून उदय बी. सिद्दण्णावर तर व्यापारी क्षेत्रातून राजू बी. पाटील, संभाजी के. होनगेकर यांनी माघार घेतली आहे. सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत माघार घेण्याची मुभा आहे. त्यामुळे त्या दिवशी अनेक जण माघार घेण्याची शक्मयता असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कृषीमाल विक्री संघातून प्रमोद पाटील आणि शेतीमाल प्रक्रिया मतदार संघातून मनोज मत्तीकोप्प यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये हे केवळ दोनच अर्ज आले आहेत. त्यामुळे ते बिनविरोध होण्याची शक्मयता आहे. पण आताच आम्ही बिनविरोध म्हणून जाहीर करू शकत नसल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी म्हटले आहे. 12 जानेवारी रोजी एपीएमसी निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने विविध राजकीय पक्षांनी आणि म. ए. समितीने आतापासूनच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.   

Related posts: